एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या उस्मानाबादेत आज आंदोलनाला फक्त 15 कार्यकर्ते, पहा व्हिडीओ

In the presence of 15 activists, NCP ended the agitation ; उस्मानाबादमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात 14 ते 15 कार्यकत्यांनी आंदोलन केले. यावेळी, ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देखील देण्यात आल्या.

In the presence of 15 activists, NCP ended the agitation
उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या आंदोलनाला कार्यकर्ते मिळेना?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आव्हाडांच्या समर्थनात निघालेल्या आंदोलनाला उस्मानाबादेत फक्त 15 कार्यकर्ते
  • 15 कार्यकर्त्यांनीचं उरकली आंदोलनाची औपचारीकता
  • एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समाजाला जायचा

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताचं राष्ट्रवादीसह, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सदर गुन्हा खोटा असल्याचं म्हटलं होत. दरम्यान, आव्हाड यांच्या समर्थनात राज्यात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असला तरी एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आज आंदोलनाला फक्त 14 ते 15 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते हजर होते.

अधिक वाचा ; आजचे राशीभविष्य; जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस

15 कार्यकर्त्यांनीचं उरकली आंदोलनाची औपचारीकता

उस्मानाबादमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात 14 ते 15 कार्यकत्यांनी आंदोलन केले. यावेळी, ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देखील देण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित न झाल्याने 14 ते 15 कार्यकत्यांनीचं सदर आंदोलन औपचारीकरित्या पार पाडले असल्याचे दिसून आले. एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समाजाला जायचा. मात्र, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला जिल्ह्यात सक्षम नेतृत्वचं नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे नेते आहेत त्यांच्या मनमानी कारभारामुळे किंवा हेकीखोरपणामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पुन्हा अच्छे दिन येतील याची काही शक्यता वाटतं नाही.

अधिक वाचा ; शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन, काय झाली चर्चा? 

आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच शरद पवारांनी थेट शिंदेंना केला फोन

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात थेट चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री यांना कॉल केला आणि त्यानंतर दोघांमध्ये संभाषण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अधिक वाचा '; भाग्यांक 5 आणि 6 असलेल्यांनी जोडीदार निवडताना लक्षात ठेवा हे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी