औरंगाबाद : येत्या १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी औरंगाबादमध्ये वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच करण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात येत आहे. दरम्यान, अशीच मागणी एमआयएमनेदेखील केली आहे. तर दुसरीकडे महापालिका मात्र या पुतळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हाताने करण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे, महाराजांचा पुतळा उद्घाटन वादाच्या भवऱ्यात अडकतो की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा पुतळा शहरातील क्रांती चौक येथे स्थापन करण्यात आला असून येत्या १० फेब्रुवारी रोजी अनावरण केले जाणार आहे.
अधिक वाचा : नवाजुद्दीन झाला 'नवाब'मध्ये शि
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानेदेखील हीच भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला आहे. सदर पुतळ्याच्या उद्घाटनाच कार्यक्रम येत्या १० फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला आहे. शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद शहरात आगमन झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या आनंदाचे वातावरण असताना आता हा वाद नेमका कसा मिटवला जातो याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Amit Shah in UP : अमित शहांचा विरोधकांवर जोरदार प्रहार
दरम्यान, हे सर्व प्रकरण सुरु असताना भाजपने तर वेगळीच भूमिका घेतली असल्याचं दिसून येत आहे. भाजपाच्या वतीने म्हटलं आहे की, महाराजाच्या पुतळ्याचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारी रोजी करण्यात यावे. १० तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर आम्ही त्याचा विरोध करु अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद पालिका पुतळ्याचे उद्घाटन १० फेब्रुवारीलाच करण्याचे नियोजन आखत आहे. नियोजनानुसार पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय