kailas patil : नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी तलावात उतरले, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले

Jalasamadhi movement to support MLA kailas patil ; शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असून, त्यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळताना पहायला मिळत आहे. दरम्यान, पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काही कार्यकर्ते आणि शेतकरी हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले

Jalasamadhi movement to support MLA kailas patil
आमदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जलसमाधी आंदोलन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाडोळी या गावाच्या ३० ते ४० शेतकऱ्यांनी थेट शेजारील तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे
  • दुसरीकडे अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले शेतकरी
  • बाराशे कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत – आमदार कैलास पाटील

उस्मानाबाद : पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे (Uddhav Thakrey) गटाचे आमदार पाटील (Kailas Patil ) हे गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदानाचे पैसे येत नाहीत, तोपर्यंत उपोषणावरुन उठणार नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आता उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या गावाच्या ३० ते ४० शेतकऱ्यांनी थेट शेजारील तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कैलास पाटील उपोषण मागे घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील पाण्याचा बाहेर निघणार नसल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; हा खेळाडू कसा बनला PAK च्या 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन?

अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले शेतकरी

कैलास पाटील यांचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असून, त्यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळताना पहायला मिळत आहे. दरम्यान, पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काही कार्यकर्ते आणि शेतकरी हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले. शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, यावेळी अग्निशमन दलाची गाडी देखील बोलावण्यात आली होती. त्याचबरोबर, कोणी प्रकार घडू नये म्हणून खाली जाली देखील लावण्यात आल्याचे पहायला मिळाले.

अधिक वाचा ; इलॉन मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले, नेमके काय झाले

बाराशे कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत – आमदार कैलास पाटील

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्याची तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात तात्काळ जमा करावी. 531 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये. सन 2020-21 च्या पिक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपयाची रक्कम ही विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.

अधिक वाचा ; खुर्चीवर बसून होईल वजन कमी, वाचा खास टिप्स 

मागण्या मान्य होईपर्यंत  आमरण उपोषण करणार 

आमदार कैलास पाटील यांनी पीकविमा आणि अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी केली होती. आपली मागणी मान्य नाही झाली तर उपोषणाचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी केला होता त्यानुसार ते आमरण उपोषण करत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषण स्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या राशीचे लक्ष्मीपुजन देखील कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला विमा कंपनी व सरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये मिळणार असून ती रक्कम थकीत आहे. ऐन दिवाळीत ठाकरे गट आमरण उपोषण व गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याने सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी