औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या अगोदर शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आल्याने स्टेजवरच मोठे नाट्य पहायला मिळाल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत या नाट्य बघायला मिळाले आहे. खैरे यांचा अगोदर सत्कार झाल्याने संजय शिरसाट हे प्रचंड चिडले होते. दरम्यान, त्यांनी स्टेज देखील सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांचा हात पकडला आणि त्यांना थांबवले. यानंतर लगेच संजय शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटलं. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नेत्यांच्या रुसवे फुगवे जनतेला पहायला मिळाले. या रुसवे फुगच्याची चर्चा मात्र जोरदार चर्चा शहरात राज्यात जोरदार सुरु आहे.
अधिक वाचा ; यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' स्तोत्राचे पठण, दुःख जातील पळून
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. संत एकनाथ रंगमंदिरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या आयोजित बैठकीत सर्व मान्यवरांच्या स्वागताचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, याच स्वागतामुळे मंचावर मोठी नाराजीनाट्य पहायला मिळाले आहे. सुरुवातील औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव पुकारण्यात आले, जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. जसेच खैरेंचे नाव पुकारले तसाच आमदार संजय शिरसाट यांचा पारा चढला. आणि ते थेट खुर्चीवरून उठून माझा प्रोटोकॉल नुसार खैरे यांच्या अगोदर सत्कार करायला हवा होता असं म्हणत ते मंच सोडून जात होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले.
अधिक वाचा :सकाळी उठल्याबरोबर या 4 छोट्या गोष्टी...केस आणि त्वचा चमकेल
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉल पाळला नाही. असं म्हणत शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरला. त्यांची समजुत काढून शांत केले. खैरेंच्या स्वागतानंतर लगेच शिरसाट यांचे स्वागत करण्यात आले. शिरसाट हे शिंदे गटात गेल्यानंतर खैरे आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते.
अधिक वाचा ; कतरिना कैफचे चाहते आहात? या मुलांचा डान्स व्हिडीओ एकदा पाहा
पोलीस विभाग गणेश मंडळाना सुचणा देण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्यात येते
शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस विभाग दरवर्षी शहरातील सर्व राजकीय पक्षतील नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आमंत्रित करत बैठक आयोजित करत. शहरात किमान एक हजाराच्या जवळपास गणेश मंडळ आहेत. गणेशोत्सव दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यासह गणेश मंडळांना परवानगी घेताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग गणेश मंडळाना सुचणा देण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्यात येते.