80 हून अधिक वय असलेल्या माता-पित्यांना वर चढणे शक्य नव्हते, न्यायाधीशांनी चक्क पार्किंमध्ये केला निवाडा!

judge came to the courts parking lot in Aurangabad ; 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या वृद्ध माता-पित्यांना तिसऱ्या मजल्यावर चढणे शक्य नसल्याचे लक्षात येताच न्यायाधीशांनी स्वत: खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या वृद्धांची बाजू ऐकून घेतली. ही घटना औरंगाबादमध्ये घडली

judge came to the courts parking lot in Aurangabad
दांपत्याला वर चढणे शक्य नव्हते,न्यायाधीश स्वतः पार्किंगमध्ये   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • न्यायाधीशांनी स्वत: खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या वृद्धांची बाजू ऐकून घेतली.
  • न्यायाधीशांनी तडजोडीअंती 9 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले
  • न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानंतर या रकमेचा धनादेश लगेचच वृद्ध दांपत्याना देण्यात आला

औरंगाबाद :  80 वर्षाहून अधिक वय असलेल्या वृद्ध माता-पित्यांना तिसऱ्या मजल्यावर चढणे शक्य नसल्याचे लक्षात येताच न्यायाधीशांनी स्वत: खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या वृद्धांची बाजू ऐकून घेतली. ही घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी तडजोडीअंती 9 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानंतर या रकमेचा धनादेश लगेचच वृद्ध दांपत्याना देण्यात आला आहे.

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या

 औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हे प्रकरण आले होते

 मिलेलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हे प्रकरण आले होते. कंपनीत काम करताना मरण पावलेल्या मुलाच्या वृद्ध माता-पित्यांनी भरपाई मिळण्यासाठी 10 वर्षे कामगार न्यायालयात चकरा मारत होते. अखेर त्या वृद्ध माता पित्यांना आज न्याय मिळाला आहे. दरम्यानं, सुनावणी तिसऱ्या मजल्यावर होती. वय 80 वर्षाच्या पुढे असल्याने वृद्ध दाम्पत्याला पायऱ्या चढून वर जाणे शक्य नव्हते. यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश के एन शर्मा, पॅनल सदस्य एडवोकेट सचिन गंडले, एडवोकेट विनोद पवार यांनी खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या रफिकच्या वृद्ध माता - पित्यांची बाजू ऐकून घेत तडजोडी अंत 9 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

अधिक वाचा : नागपुरात तरुणांना वायुसेनेकडे आकर्षित करण्यासाठी एअर शो 

खोपोली येथील सीमेस्टिक कंपनीमध्ये काम करत असताना झाला होता रफिकचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा येथील रहिवासी असलेला रफिक खान नवाज खान पठाण हा खोपोली येथील सीमेस्टिक कंपनीमध्ये काम करत होता. यावेळी त्याचा मृत्यू झाला. काम करत असताना मृत्यू झाल्यामुळे कंपनीतील अपघात म्हणून त्यांना 3 लाख रुपये आर्थिक मदत दिली होती. मात्र, सदर मदत तुटपुंजी असल्यामुळे कुटुंबीयांनी न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणाचा खटला गेल्या 10 वर्षांपासून सुरू होता. अखेर त्यांना १० वर्षांनी न्याय मिळाला असून, रफिकच्या वृद्ध मात्या- पित्यांना थेट पार्किंग मध्ये येऊन त्यांची बाजू समजून घेत तडजोडी आणि त्यांना न्याय मिळवून दिल्यामुळे या निर्णयामुळे ते भारावून गेले होते.

अधिक वाचा ; जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा केसची रहस्य उलगडण्याची शक्यता

अधिक वाचा ; महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी