एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास

Kailash Patil escaped from the clutches of Eknath Shinde :आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात ओढून सुरतला नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते हुलकवणी देत वाटेतुन निसटले, त्यांनी चिखलातून वाट काढत थोडा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी एका दुचाकी गाडीला हात करत २ किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी एका ट्रकला हात केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणीही गाडी थांबवत नव्हत.

Kailash Patil escaped from the clutches of Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटलेले कैलास पाटील कसे निसटले?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिंदे हे नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे
  • शिंदे यांनी काही आमदारांना बळजबरीने घेऊन गेले असल्याचा दावा शिवसेना नेत्यानी केला
  • मोठ्या शिताफिने कैलास पाटील हे शिंदे यांच्या तावडीतून निसटले.

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत येथे गेले असल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे हे नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे, दरम्यान, शिंदे यांनी काही आमदारांना बळजबरीने घेऊन गेले असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे शिंदे यांनी जबरस्तीने उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांना घेऊन चालले होते. मात्र, सोबत मोठ्या शिताफिने कैलास पाटील हे शिंदे यांच्या तावडीतून निसटले.

अधिक वाचा ; आमदार देशमुखांना शिवसैनिक सोडणार नाही,जिल्हाप्रमुखांचा इशारा

नेमकी काय घडली घटना?

शिवसेनेचे उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गळला लागले होते. शिंदे यांनी पाटील यांना त्यांचा मनसुबा कळू दिला नाही आणि ते थेट आमदार पाटील यांना सुरतच्या दिशेने घेऊन जाऊ लागले. मात्र शिंदेचा डाव कैलास पाटील यांनी ओळखला आणि पाटील मोठ्या शिताफिने त्यांच्या तावडीतून निसटले आणि अनेक संकटावर मात करीत मातोश्रीवर दाखल झाले. कैलास पाटील यांची शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाप्रति असलेली एकनिष्ठा या निमित्ताने समोर आली आहे.

नेमकं पाटील वर्षा निवासस्थानी कसे पोहोचले?

उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात ओढून सुरतला नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते हुलकवणी देत वाटेतून निसटले, त्यांनी चिखलातून वाट काढत थोडा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी एका दुचाकी गाडीला हात करत २ किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी एका ट्रकला हात केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणीही गाडी थांबवत नव्हत. थोड पुढे आल्यानंतर त्यांना एका ट्रकवाल्याने आपल्या गाडीत बसवले आणि ते मुंबईपर्यंत आले. पुढे आपल्यानंतर कैलास पाटील यांनी आपला मोबाईल बंद चालू केला. आपला जीव धोक्यात घालून कैलास पाटील त्या सर्वाना गुगारा देत रात्रीतून वर्षा बंगला गाठला.

अधिक वाचा : Zodiac Sign: या राशीचे लोक असतात खूप वायफळ खर्च करणारे...

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे २ आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन सत्तातर करण्याचा मनसूबा शिंदे यांचा असल्याच बोलले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल असून ते शिंदे यांच्या गोटात गेल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा ; Dark Underarms मुळे Sleeveless घालणं मुश्किल, मग करा हे उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी