करुणा शर्मा प्रकरणात नेमकं काय झालं?दोन्ही पक्षाच्या वकिलांनी मांडली आपआपली बाजू

karuna sharma case bail application resul pending : करुणा शर्मा यांचा पुन्हा एकदा कारागृहात मुक्काम वाढला आहे. शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली असून याचा निकाल कोर्टाने राखीव ठेवला आहे

karuna sharma case bail application resul pending
करुणा शर्मा प्रकरणात नेमकं काय झालं?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये - सरकारी वकिल
  • दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करून आपापली बाजू मांडली
  • मला खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे – करुणा शर्मा

बीड : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या करुणा शर्मा यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. आज याचं प्रकरणात अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. सदर प्रकरणावर राज्याचे लक्ष लागून आहे. आज अंबाजोगाई करुणा शर्मा यांच्या जामीन प्रकरणी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. शर्मा यांच्या जामीन अर्जावरील झालेल्या सुनावणीवर उद्या निकाल येणार असल्याची माहिती आहे.

करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये - सरकारी वकिल

करुणा शर्मा यांचा पुन्हा एकदा कारागृहात मुक्काम वाढला आहे. शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली असून याचा निकाल कोर्टाने राखीव ठेवला आहे. यावेळी करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचे कृत्य करू नये. अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली. आता या प्रकरणावर कोर्ट उद्या निकाल देणार आहे. कोर्ट हा निकाल उद्या देणार असल्याची माहिती, करुणा शर्मा यांचे वकील ऍड. जयंत भाराजकर यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे.

दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करून आपापली बाजू मांडली

करुणा शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजप देखील आक्रमक झालं असल्याचं पहायला मिळालं होत. त्यामुळे, करुणा शर्मा प्रकरणाची राज्यात चर्चा झाली होती. याच प्रकरणाची  अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करून आपापली बाजू मांडली आहे. मात्र यावरील निकाल कोर्टाने राखीव ठेवला आहे. त्यामुळं हा निकाल उद्या होणार असून आता कोर्ट काय निकाल देणार ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मला खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे – करुणा शर्मा

दरम्यान, करुणा शर्मा  यांना वकील नसल्यामुळे त्यांनी स्वतःची बाजू स्वतःच मांडली असल्याचं समोर आलं आहे. करुणा शर्मा यांनी मांडलेल्या बाजूवर न्यायाधीश एस एस सापटनेकर यांनी करुणा शर्मा यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, करुणा शर्मा म्हणल्या की मला खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांनी मी निर्दोष असल्याचं देखील म्हटलं आहे. यावर न्यायाधीशांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर करुणा शर्मा यांचे लीगल वकील उद्या किंवा परवा शर्मा यांचा जमीन अर्ज दाखल करणार असल्याचे स्थानिक वकील एस एम गलांडे यांनी म्हटले आहे. 

 ड्रायव्हर दिलीप पंडित यांच्यावर अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

करुणा शर्मा यांच्यासोबत आलेल्या ड्रायव्हरला देखील परळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ड्रायव्हर दिलीप पंडित यांच्यावर अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. करुणा शर्मा यांची गाडी ही नसून ती भाड्याची गाडी घेऊन शर्मा परळी येथे आल्या होत्या. त्यामुळे गाडीचा ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे परळी पोलिसांनी माहिती दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी