कोण पण समोर येऊ दे, मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही असं स्टेटस ठेवला आणि सकाळी झाला मृत्यू

Kept the status at night and died in the morning ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही, असं स्टेटस ठेवलेल्या तरुणाचा  दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पाटोद्यातील जाधव वस्ती येथे घडली आहे.

Kept the status at night and died in the morning
मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेट्स ठेवलेल्या तरुणाचा सकाली झाला मृत्यू
  • कोण पण समोर येऊ दे...’ असं स्टेटस कृष्णाने ठेवलं होतं.
  • मुलाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे

बीड  : मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही, असं स्टेटस ठेवलेल्या तरुणाचा  दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पाटोद्यातील जाधव वस्ती येथे घडली आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मिळालेल्या माहितनुसार, मृत तरुणाने रात्रीच मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही, असं फेसबुक स्टेटस या तरुणाने रात्री ठेवलं होतं. मात्र, अवघ्या काही तासातच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा दिलीप जाधव असं मयत तरुणाच नावं आहे.

अधिक वाचा : Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे,त्वचा होईल मुलायम

कोण पण समोर येऊ दे...’ असं स्टेटस कृष्णाने ठेवलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर ‘मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही... कोण पण समोर येऊ दे...’ असं स्टेटस ठेवलं होतं. मात्र, सकाळी उठल्यावर कृष्णाने नेहमीप्रमाणे दूध विक्रीचा व्यवसाय करायला गेला होता. यादरम्यान, काही ग्रामस्थांना कृष्णा हा गंभीर अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. तातडीने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक वाचा ; म्हणून पतीने केलं पत्नीचं टक्कल, सोलापुरातील धक्कादायक घटना 

मुलाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे

सकाळी सात वाजेच्या सुमारास कृष्णा नेहमीप्रमाणे घरातील दूध बरोबर घेऊन दुचाकीवरून (एमएच 12 सीयू 1913) लिंबादेवी फाट्यावरील डेअरीकडे निघाला होता. यावेळी, गावातील काही नागरिकांना कृष्णा हा गंभीर अवस्थेत पडल्याचं दिसून आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कृष्णाच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या खांद्याजवळही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे कृष्णाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी