Shivsena dasara melava शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळताच खैरेंना अश्रू अनावर

Khair shed tears after getting permission for Dussehra gathering at Shivtirtha : गेली अनेक वर्षे दसरा मेळावा होत असलेल्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम होणं हा अत्यंत भावनिक विषय आहे. सध्यातरी आम्ही दसरा मेळाव्याच्या तयारीला लागणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर हा कोट्यवधी शिवसैनिकांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा भावनिक विषय असल्याची प्रतिक्रिया देखील खैरे यांनी दिली आहे.

Khair shed tears after getting permission for Dussehra gathering at Shivtirtha
शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळताच खैरेंना अश्रू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे
  • निकालानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अतिशय भावूक
  • सध्यातरी आम्ही दसरा मेळाव्याच्या तयारीला लागणार – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद  आज मुंबई उच्च न्यायालयाने (high court ) उद्धव ठाकरे (uddhav Thakrey) यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांकडून (Shivsena) जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे शिवसेनेचा प्रसिद्ध दसरा मेळावा हा मागील अनेक वर्षे होत असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरचं यावर्षीही  होणार आहे. दरम्यान, मेळावा घेण्याची परवानगी ठाकरे गटाला कि शिंदे गटाला मिळणार? असा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रत्येकाला होता. मात्र, आज अखेर  उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अतिशय भावूक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, निकालानंतर  त्यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं दिसून आले. हा राज्यभरातील कोट्यावधी शिवसैनिकांचा विजय असल्याचं खैरे यांनी माध्यमांना बोलताना म्हटलं आहे.

अधिक वाचा ; अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे 'हे' पाणी, जाणून घ्या

सध्यातरी आम्ही दसरा मेळाव्याच्या तयारीला लागणार – चंद्रकांत खैरे

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, गेली अनेक वर्षे दसरा मेळावा होत असलेल्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम होणं हा अत्यंत भावनिक विषय आहे. सध्यातरी आम्ही दसरा मेळाव्याच्या तयारीला लागणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर हा कोट्यवधी शिवसैनिकांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा भावनिक विषय असल्याची प्रतिक्रिया देखील खैरे यांनी दिली आहे. मी सकाळपासूनच खूप चिंतेत होतो. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप छळलं, न्याय दिला नाही, परंतू न्यायपालिकेनं अखेर न्याय दिला. यातून परमेश्वराकडं न्याय आहे, हे ही दिसून आलं.  आई जगदंबेच्या कृपेने हा न्याय मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोट्यवधी शिवसैनिकांचा हा विजय आहे असं खैरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; अपहरण केलेल्या मुलीला घरी सोडताच अपरहणकर्त्याचा गेला जीव 

अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला – उच्च न्यायालय

आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाला या प्रश्नावरुन हायकोर्टात आज सुनावनी झाली. या सुनावणीत  सर्वात आधी उच्च न्यायालयाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेलाही खडेबोल सुनावले. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसंच कायदा सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास याचिकाकर्ते जबाबदार राहतील, असं नमूद करत सर्व नियम आणि अटीशर्तींचं पालन करणं बंधनकारक असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 

अधिक वाचा ; मिळाला दणकून बोनस, खूश होते कर्मचारी, पण कंपनीने परत मागितला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी