विद्यार्थ्याचे अपहरण करुन मागितली ४ कोटींची खंडणी, पोलीस तपासात बाहेर आली धक्कादायक माहिती

kidnappers Kidnap A 10th Standard Student In Jalna And Demand Rs 4 Crore : कार ड्रायव्हरने स्वयमचे अपहरण झाले असून ४ कोटींची खंडणी मागितल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या घरच्यांनी पोलिसांची मदत घेतली आणि एक धक्कादायक माहिती सर्वांसमोर आली.

kidnappers Kidnap A 10th Standard Student In Jalna And Demand Rs 4 Crore
विद्यार्थ्याचे अपहरण करुन मागितली ४ कोटींची खंडणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्याचे अपहरण करुन मागितली ४ कोटींची खंडणी
  • पोलीस तपासात बाहेर आली धक्कादायक माहिती
  • कार ड्रायव्हरची पोलीस चौकशी सुरू

kidnappers Kidnap A 10th Standard Student In Jalna And Demand Rs 4 Crore : जालना : दहावीत शिकत असलेला स्वयम गादिया परीक्षा देण्यासाठी खासगी कारमधून गेला होता. परीक्षेची वेळ संपली तरी तो परतला नाही. घरच्यांनी चौकशीसाठी कारच्या ड्रायव्हरला फोन केला. ड्रायव्हरने स्वयमचे अपहरण झाले असून ४ कोटींची खंडणी मागितल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या घरच्यांनी पोलिसांची मदत घेतली आणि एक धक्कादायक माहिती सर्वांसमोर आली.

घरच्यांनी फोन केला त्यावेळी कार ड्रायव्हरने अपहरण प्रकरणाची माहिती दिली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ड्रायव्हरचे लोकेशन तपासले. ड्रायव्हर अंबड तालुक्यातील शहापूर येथे असल्याचे दिसले. नंतर पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे कार, कार ड्रायव्हर आणि स्वयम गादिया दिसला. हा प्रकार पाहून पोलीस चक्रावले. पोलिसांच्या पथकाने स्वयमला ताब्यात घेऊन त्याच्या घरच्यांकडे सोपविले. कार ड्रायव्हरची पोलीस चौकशी सुरू आहे. 

अपहरण झाले होते तर स्वयम कार ड्रायव्हरसोबत कसा आढळला, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावर माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी