Kirit Somaiya Item Girl : किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच बाळासाहे ठाकरे हे स्वतः युती तोडण्याच्या विचारात होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनीची युती व्हावी असा प्रस्तावही होता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. 

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल
  • बाळासाहे ठाकरे हे स्वतः युती तोडण्याच्या विचारात होते.
  • राष्ट्रवादी आणि शिवसेनीची युती व्हावी असा प्रस्तावही होता

Kirit Somaiya Item Girl : नांदेड : किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच बाळासाहे ठाकरे हे स्वतः युती तोडण्याच्या विचारात होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनीची युती व्हावी असा प्रस्तावही होता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. (Kirit Somaiya is Item Girl of bjp ncp leader nawab malik crtiticized)

मलिक म्हणाले की, किरीट सोमय्या हे राजकारणात भाजपच्या आयटम गर्ल सारखे काम करत आहेत. चित्रपट चालण्यासाठी जशी एखादी आयटम गर्लची गरज लागते तशाच प्रकारे किरीट सोमय्या राजकारणातील भाजपचे आयटम गर्ल आहेत. त्यांच्या वक्त्यव्याची बातमी कशी होईल आणि आयटम गर्ल सारखा कार्यक्रम सुरू राहील यासाठी ते प्रयत्नशील राहतात असेही मलिक म्हणाले. 

बाळासाहेब युती तोडण्याच्या विचारात होते

पाच वर्षापूर्वीचे निकाल पाहिले तर लक्षात येईल की भाजप शिवसेनेचे खच्चीकरण करत होते  असे मलिक म्हणाले.  २५ वर्षे युतीत आमची सडली असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते पाच वर्षांपूर्वीपेक्षा आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. आता महानगरपालिका, नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली हे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. भाजपची साथ सोडल्याने शिवसेनेचा फायदा झाल्याचे मलिक यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनीच युतीचा निर्णय घेतला होता, परंतु बाळासाहेब हयात असताना युतीतून बाहेर पडले पाहिजे असा विचार शिवसेनेत केला गेला. जेव्हा आम्ही काँग्रेससोबत होतो तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे असा प्रस्ताव आला होता. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव बारगळला. भाजपसोबत शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. २०१९ च नाही, त्यापूर्वीही पक्षात याबाबत चर्चा सुरू होती.  भाजप ज्या पक्षासोबत राहते त्या पक्षाचे खच्चीकरण करते. भाजप आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचे कारस्थान करते ही बाब शिवसेनेच्या आधीपासून लक्षात आली होते, त्यामुळे शिवसेनेने भाजपशी युती तोडली आहे. शिवसेनेसोबत असतना भाजप मोठी झाली, ही बाब आता देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली आहे. परंतु ८ वर्षापूर्वीपासून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे जे राजकारण सुरू केले होते, दिल्लीच्या नेत्यांकडून त्यांना तसे आदेशच होते. पण आता शिवसेना काय आहे हे त्यांना कळू लागले आहे. त्यामुळेच फडणवीस अशा प्रकारची विधाने करत आहेत असेही मलिक यांनी नमूद केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी