Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची स्कार्पिओ ट्रॅक्टरला धडकली, कीर्तनासाठी जात असताना महाराजांचा अपघात

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 09:50 IST

 सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओ गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे, तर महाराज सुखरुप आहेत. 

Kirtankar Indorikar Maharaj Accident in partur
इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • परतूर येथील एका वळणावर इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओ गाडीची ट्रॅक्टरला धडकली.
  • जखमी चालकाला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Indorikar Maharaj Accident  : जालना :  सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओ गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे, तर महाराज सुखरुप आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, काल जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून महाराज दुसरीकडे किर्तन करण्यासाठी जात होते. परतूर येथील एका वळणावर इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.  जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. 

ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.  अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शाम पांढरपोटे,नरेंद्र चव्हाण, दीपक खरात घटनास्थळावर दाखल झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी