मतांसाठी आमदारांना टाटा सफारीची ऑफर, एकूण ४५ गाड्या देणार असल्याचं निटूरे यांच वक्तव्य , पहा व्हिडीओ

kisan bahujan parti president Arun nature will filed candidature form give offer to mlas tata safari : अरुण निटूरे यांनी म्हटलं आहे की, त्यांना मदत करणाऱ्या एका आमदाराला मतदारसंघात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक टाटा सफारी गाडी देणार आहेत. एक गाडीची किंमत जवळपास २६ लाख रुपये आहे. अशा ४५ गाड्या ते आमदारांना देणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

kisan bahujan parti president Arun nature will filed candidature form give offer to mlas tata safari
मतांसाठी आमदारांना टाटा सफारीची ऑफर, पहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्याने आमदारांना सफारी गाडीची ऑफर दिली आहे
  • निटूरे हे आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल करणार आहेत
  • २६ लाख रुपये एका गाडीची किंमत

उस्मानाबाद : एकीकडे राज्यसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच व घोडेबाजार जोरात सुरु असताना उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्याने आमदारांना सफारी गाडीची ऑफर दिली आहे.राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे हे उद्या ३१ मे रोजी मुंबई विधानभवन येथे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत निटूरे यांना आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देणार असल्याची त्यांची घोषणा आहे. निटूरे यांनी ४५ सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी २६ लाखप्रमाणे ११ कोटी ८१ लाख खर्च करणार आहेत.निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केले आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. निटूरे यांनी यापूर्वी वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक लढविली होती.

अधिक वाचा ; पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा संदेश 

निटूरे हे आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल करणार आहेत

उस्मानाबाद येथील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे (Arun Niture) यांनी राज्यसभा निवडणूक लढवायचे ठरवले आहे. त्यासाठी अरुण निटूरे हे आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी टाइम्स नाऊशी बोलताना दिली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणाचा उमेदवार निवडून येणार, यावरुन सध्या चुरस निर्माण झाली आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) यांच्यापैकी कोणाकडेही तेवढे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक रंगतदार होईल. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अशातच निवडणुकीच्या रिंगणात आणखी एका उमेदवाराने एन्ट्री घेतली आहे.

अधिक वाचा ; हेल्टेमशिवाय बाईक चालवत होता पोलिस, पाहा पुढे काय घडले

२६ लाख रुपये एका गाडीची किंमत

दरम्यान, अरुण निटूरे यांनी म्हटलं आहे की, त्यांना मदत करणाऱ्या एका आमदाराला मतदारसंघात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक टाटा सफारी गाडी देणार आहेत. एक गाडीची किंमत जवळपास २६ लाख रुपये आहे. अशा ४५ गाड्या ते आमदारांना देणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. निटूरे यांना जर गाड्या खरेदी करायच्या असतील तर त्यांना तब्बल ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्चावे लागणार आहेत.

अधिक वाचा :  अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण- अहवाल 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी