Latter to Uddhav Thackeray : शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने लिहिले थेट उद्धव ठाकरेंना पत्र

shivasena mla wrote letter to uddhav thackeray : काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दलच्या लिहिलेले पत्र हे अनेक दिवस चर्चेत आहे. हे प्रकरण ताजं असताना शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे

shivasena mla wrote letter to uddhav thackeray
शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने लिहिले थेट उद्धव ठाकरेंना पत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मुख्यमंत्र्यांना केली मागणी
  • आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली
  • अनेक दिवसांपासून तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा आहेत

Latter to Uddhav Thackeray । औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे भूम – परंडा – वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. असं पत्र आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान , काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दलच्या लिहिलेले पत्र हे अनेक दिवस चर्चेत आहे. हे प्रकरण ताजं असताना शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.  त्यामुळे तानाजी सावंत यांनी लिहिलेले पत्र याचा राजकीय काही अर्थ लावला जातो कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात परिवहन मंत्रिपद शिवसेनेकडे आहे

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे. कारण राज्यात परिवहन मंत्रिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. मात्र, आपल्याच पक्षातील मंत्र्याकडे परिवहन खाते असताना देखील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर परंडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हे पत्र लिहिल्यानं चर्चा होत असून, गेल्या काही दिवसांपासून सावंत नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

नेमकं तानाजी सावंत यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या करिता एस. टी. कामगार संघटनांनी राज्यभर संप सुरू केलेला असून एस.टी. कामगारांच्या बऱ्याच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत परंतु एस. टी. कामगार संघटना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असून विलीनीकरणासह अन्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची संघटनेने मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने एस.टी. कामगार संघटनेचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा ही नम्र विनंती. असं पत्र तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी