२१ दिवसांनी त्या हत्येच गूढ उलगडलं, धक्कादायक माहिती आली समोर, हत्येचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Latur district famous murder case, 2 arrest : लातूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती. सदर घटना देवणी तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारात घडली होती. खून झालेला व्यक्ती हा अनोळखी होता.

Latur district famous murder case, 2 arrest
२१ दिवसांनी त्या हत्येच गूढ उलगडलं, धक्कादायक माहिती समोर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आरोपींनी पुरावा नष्ट सर्व कागदपत्रे, ओळखपत्र, मोबाईल फोन घेऊन पळ काढला
  • घटनेच्या पाच दिवसांनी बालाजी बनसोडे यांचा मृतदेह देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात सापडला
  • पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

लातूर : लातूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती. सदर घटना देवणी तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारात घडली होती. खून झालेला व्यक्ती हा अनोळखी होता. त्यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांना या घटनेचा छडा लावणे म्हणजे मोठ आव्हान होत. सदर व्यक्तीचा दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. मृताची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी या घटनेचा अखेर २१ दिवसात छडा लावला आहे. पोलिसांनी सदर हत्येचं गूढ अगदी कमी दिवसात उलगडल्यान आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक (२ Arrest) केली आहे. हत्येचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहे. 

आरोपींनी पुरावा नष्ट सर्व कागदपत्रे, ओळखपत्र, मोबाईल फोन घेऊन पळ काढला

१६ जूनच्या रात्री देवणी तालुक्यातील वलांडी याठिकाणी बनसोडे यांची दोघांनी दगडानं ठेचून हत्या केली आहे.बालाजी बनसोडे असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील बिहारीपूर येथील रहिवासी आहे. दरम्यान, बनसोडे यांची हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी बनसोडे यांच्याजवळील सर्व कागदपत्रे, ओळखपत्र, मोबाईल फोन घेऊन पळ काढला देखील काढला असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे हे देखील अवघड काम झालं होत. त्याचबरोबर आरोपींनी मृत बनसोडे चालवत असलेलं पिकअप घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. 

घटनेच्या पाच दिवसांनी बालाजी बनसोडे यांचा मृतदेह देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात सापडला

घटनेच्या पाच दिवसांनी बालाजी बनसोडे यांचा मृतदेह देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात स्थानिक नागरिकांना दिसला आणि त्यांनी सदर मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिल्यामुळे हत्येचं प्रकरण उघडकीस आलं. पण मयत व्यक्तीची ओळख पटेल असा कोणताही पुरावा नव्हता. दरम्यान, यानंतर पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

   

या कारणामुळे झाली बनसोडे यांची हत्या

१६ जून रोजी म्हणजेच हत्या झाल्याच्या दिवशी मृत बालाजी बनसोडे हे महिंद्रा पिकअप घेऊन त्याच रस्त्यानं प्रवास करत होते. आणि त्याच रस्त्यावर हेळंब येथील रहिवासी असणारे आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी आणि ज्ञानेश्वर भारत बोरसुळे हे देखील उदगीरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबले होते. दोघे आरोपी प्रत्येक वाहनाला हात करत होते, मात्र गाडी कोणीही थांबवत नव्हतं.दरम्यान, आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी आणि ज्ञानेश्वर भारत बोरसुळे यांनी मृत बनसोडे यांच्या वाहनाच्या आडवं येत वाहन थांबवलं. यामुळे चालक बनसोडे आणि दोन आरोपींमध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची वाढत गेली आणि यातूनच बनसोडे यांची दगडानं ठेचून या दोन्ही आरोपींनी हत्या केली आणि मृताचा पिकअप घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी