लातूरमध्ये घडली धक्कादायक घटना, वृद्ध महिलेचा नातू आणि सुनेने केला खून, पण पुढचा प्रयत्न फसला

Latur District murder case: लातूर जिल्ह्यात सुनेने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली

Latur District Murder Case
वृद्ध महिलेचा नातू आणि सुनेने केला खून  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वृद्ध आईकडेच पैसे का देता? आम्हाला का देत नाहीत, म्हणून घरात व्हायची सतत भांडण
  • शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून पत्नी आणि मुलगा गुन्हा दाखल 
  • सासू-सुनेच्या भांडणात शिवाजी माने यांना अनेकदा मनस्ताप व्हायचा

लातूर : लातूर जिल्ह्यात (larur District) एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सून आणि नातवाने मिळून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून (murder) केल्याची घटना निलंगा तालुक्यातील (nilanga taluka) उमरगा-हाडगा या गावात घडली आहे. आपल्या वृद्ध सासुचा सांभाळ करताना होत असलेल्या भांडणामुळे सून वैतागली होती. वैतागलेल्या सुनेने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

वृद्ध आईकडेच पैसे का देता? आम्हाला का देत नाहीत, म्हणून घरात व्हायची सतत भांडण

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या हाडगा-उमरगा इथं शिवाजी माने यांचं कुटुंब राहत होते. या कुटुंबात शिवाजी माने यांच्या आई, पत्नी आणि मुलगा एवढी मंडळी होती. शिवाजी माने यांची पत्नी आणि आई यांच्यात सारखी कुठल्या न कुठल्या कारणावरून भांडणे होत होती. मात्र त्याकडे शिवाजी माने हे दुर्लक्ष करुन आपल्या कामात व्यस्त राहत होते. पण त्यांच्या पत्नी या शिवाजी माने यांच्याशी सतत भांडण करत होत्या. तुम्ही तुमच्या आईला पैसे का देता? आम्हाला का देत नाहीत, वृद्ध आईवर का खर्च करता, अशा कारणांवरुन घरात सतत भांडणे व्हायची. आणि याच भांडणातून शिवाजी माने घरी नसताना त्यांच्या पत्नीने सासू रुक्मिणीबाई माने यांची गळा आवळून हत्या केली.

शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून पत्नी आणि मुलगा गुन्हा दाखल 

सासूचा खून करून मृत अवस्थेतच रुक्मिणीबाई यांना निलंगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा देखील असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे, पत्नी आणि मुलाने वृद्ध आईचा खून करून नैसर्गिक मृत्यू झाला असे दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न सपशेल फसला. या प्रकरणी मयत रुक्मिणीबाई यांचा मुलगा शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून शिवाजीची पत्नी ललिता माने (वय ५५) आणि मुलगा गणेश माने (वय २४) यांच्याविरोधात पोलिसात गुन्ह्याची नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सासू-सुनेच्या भांडणात शिवाजी माने यांना अनेकदा मनस्ताप व्हायचा

घटना घडली त्या दिवशी शिवाजी माने यांच्या आईनेच त्याना डबा करून दिला होता, तो अखेरचा ठरला. सासू-सुनेच्या भांडणात घरगाडा चालवणाऱ्या शिवाजी माने यांना अनेकदा सासूसूनेच्या भांडणाचा मनस्ताप व्हायचा मात्र, ते त्याकडे लक्ष न देता गाडा पुढे हाकण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, घरात कधीच अशी घटना घडेल असं त्यांना वाटलं नाही. सदर घटनेने उमरगा-हाडगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी