दीड वर्षीय चिमुरडीचा बापानेचं दारूच्या नशेत घेतला जीव

Latur district murder case : शुक्रवारी संतोष भोंडे (वय २९) हा आपल्या दीड वर्षीय सृष्टी आणि चार वर्षांचा मुलगा या दोघांसोबत घरी होता. संतोष भोंडे यांच्या घरातील सर्व सदस्य रोज कामानिमित्त आणि शेताकडे गेले होते.

Latur district murder case
दीड वर्षीय चिमुरडीचा बापानेचं दारूच्या नशेत घेतला जीव  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • घरी कोण नसल्याने सवयीप्रमाणे संतोष दिवसभर दारू पीत होता
  • सृष्टीचे आजोबा गंगादास भोंडे यांनी भादा पोलिस ठाण्यामध्ये दिली तक्रार.
  • सदर घटना शुक्रवारी २५ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली

लातूर : दीड वर्षीय पोटच्या मुलीला आपल्याच बापाने जीवे मारल्याची घटना लातूर (latur district) मध्ये घडली आहे. सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना, औसा येथील आशिव या गावात घडली आहे. दरम्यान, बापाने हे कृत्य दारूच्या नशेत केलं असून, सदर घटना शुक्रवारी २५ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. सृष्टी भोंडे असे मृत चिमुरडीचे नाव आहे. बापानेच दारूच्या नशेत मुलीला ठार मारल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घरी कोण नसल्याने सवयीप्रमाणे संतोष दिवसभर दारू पीत होता

शुक्रवारी संतोष भोंडे (वय २९) हा आपल्या दीड वर्षीय सृष्टी आणि चार वर्षांचा मुलगा या दोघांसोबत घरी होता. संतोष भोंडे यांच्या घरातील सर्व सदस्य रोज कामानिमित्त आणि शेताकडे गेले होते. याचाच फायदा घेत तो रोजच्या सवयीप्रमाणे दिवसभर दारू पीत होता. दिवसभर मोठ्या प्रमाणात दारू पिल्याने तो आपल संतुलन गमावून बसला. आणि त्याने दुपारी चारच्या सुमारास आपल्या मुलाला काही कारणास्तव बाहेर पाठवले आणि त्यांनतर घरीच असलेल्या स्वतःच्या अवघ्या दीड वर्षीय सृष्टीला चापटा, थोबाडीत मारून घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात फेकून दिले. त्यामुळे अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला.

सृष्टीचे आजोबा गंगादास भोंडे यांनी भादा पोलिस ठाण्यामध्ये दिली तक्रार.

दरम्यान , संध्याकाळच्या सुमारास संतोष भोंडे यांची पत्नी घरी आली आणि त्यांनी पाहिले तर मुलगी हौदात पडलेली दिसली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हा प्रकार उघडकीस आला. सृष्टीचे आजोबा गंगादास भोंडे यांनी भादा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्या आधारे मुलगा संतोष भोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, संतोषला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नाना लिंगे, पोलिस उपनिरीक्षक मुळीक, हेड कॉन्स्टेबल गिरी करीत आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने केला अल्पवयीन मुलीची हत्या

चारित्र्यावर संशय घेऊन अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली आहे. संशय घेण्यासाठी कुठलं न कुठलं कारण पुरेस ठरतं. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यात आला आहे. दुसऱ्या मित्रासोबत बोलते म्हणून सदर घटना घडली आहे. चार ते पाच दिवसांतचं पोलिसांनी सातत्याने कसून तपास करत या प्रकरणाचा हत्येचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला प्रियकराला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी