औरंगाबाद : कोरोनानंतर दोन वर्षांनी आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. राज्यभरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पध्दतीने स्वागत केले. औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात असलेल्या मुकुंद बालक मंदिर शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी उंटावरून विद्यार्थ्यांची सवारी काढण्यात आली आहे.
अधिक वाचा :
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९२६१ कोरोना Active, आज ४०२४ रुग्ण, २ मृत्यू
आजपासून राज्यातील शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस होता. हा दिवस अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. आमचं मुल शाळेत जाणार या सगळ्याचा आनंद पालक होताच पण शाळा आणि शिक्षकांसाठी हा विशेष दिवस होता. त्यामुळे हा दिवस विस्मरणीय करण्यासाठी औरंगाबादमधील मुकुंद बालक मंदिर शाळेने विद्यार्थांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्याचे नियोजन केले.
अधिक वाचा :
Double Your Money Tips, घराच्या तिजोरीत ठेवा ही वस्तू, सदैव राहील लक्ष्मीची कृपा
ज्या विद्यार्थ्यांनी आज पहिल्या वर्गात प्रवेश घेतला त्यांचे ढोल ताशा वाजवत व ओवाळून स्वागत करण्यात आले अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटपासून वर्गापर्यंत उंटावरून शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. दिवसभर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत विविध गाणे डान्स आणि विविध खेळ खेळण्यात आले. यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ती आनंद पाहण्यासारखा दिसत होता.