कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या : अकबरुद्दीन ओवैसी; नाव न घेता राज ठाकरेंवर खोचक टीका

Loudspeaker row, Akbaruddin Owaisi attacks Raj Thackeray, says 'those who bark, let them bark' : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केली.

Akbaruddin Owaisi attacks Raj Thackeray
कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या : अकबरुद्दीन ओवैसी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या : अकबरुद्दीन ओवैसी
  • अकबरुद्दीन ओवैसी यांचे टीकास्त्र
  • राज ठाकरेंवर अकबरुद्दीन ओवैसींची जोरदार टीका

Loudspeaker row, Akbaruddin Owaisi attacks Raj Thackeray, says 'those who bark, let them bark': औरंगाबाद : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केली. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर ओवैसींनी राज ठाकरेंवर टीका केली.

"कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या. काहीच गरज नाही. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका", असे अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

"मी कुणाला उत्तर द्यायला आलेलो नाही. मी कुणालाही वाईट बोलणार नाही. मी बोलावं इतकी समोरच्याची पात्रता नाही. ज्यांना घरातून काढले त्यांच्यावर काय बोलायचे? मी वेळ निश्चित करीन त्याचवेळी बोलेन. देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पसरवतोय असेही ओवैसी म्हणाले. 

मी आतापर्यंत दोन शाळा काढल्या आहेत. मुसलमान तरुणांच्या हातात पुस्तक आणि पेन देण्यासाठी राजकारणात आलो 
आहे; असे ओवैसी म्हणाले. ते शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी