Crime News : घरी येऊन प्रियकराने प्रेयसीचा चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात पडली होती प्रेयसी

औरंगाबाद
Updated Oct 25, 2021 | 18:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nanded Crime News : प्रेमभंग झाल्याने एका युवकाने युवतीची हत्या केली आहे. गळा चिरुन आपल्या प्रेमिकेची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर  घटना २४ ऑक्टोबर रोजी शहरातील शारदानगर येथे घडली असून पोलिसांनी आरोपीला घटनास्थळाजवळून ताब्यात घेतले आहे.

The lover killed the beloved
घरी येऊन प्रियसीचा प्रियकराने चिरला गळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक वर्षापासून दोघांचे होते प्रेमसंबंध
  • प्रेमभंग झाल्याने एका युवकाने युवतीची हत्या केली आहे
  • घटनास्थळाच्या जवळ आरोपी सुरेश शेंडगे हा पोलिसांना आढळून आला

Nanded Crime News । नांदेड : नांदेड जिल्ह्यात खळबळ उडवणारी हत्येची घटना घडली आहे. प्रेमभंग झाल्याने एका युवकाने युवतीची हत्या केली आहे. गळा चिरुन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर  घटना २४ ऑक्टोबर रोजी शहरातील शारदानगर येथे घडली असून पोलिसांनी आरोपीला घटनास्थळाजवळून ताब्यात घेतले आहे.

अनेक वर्षापासून दोघांचे होते प्रेमसंबंध

नांदेड शहरातील शारदानगर परिसरातील झेंडा चौक येथे अॅड. दिगंबर माणिक हारदळकर यांच्या घरी गौर कुटुंब भाड्याने राहत होते. याच कुटुंबातील वैष्णवी गौर हिचे आणि पांगरी येथील सुरेश देविदास शेंडगे यांचे मागील दोन ते चार वर्षापासून प्रेमसंबंधअसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वैष्णवी आणि  सुरेशचे अचानक प्रेमभंग झाल्याने आज दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरेश देविदास शेंडगे हा वैष्णवी गौर हिच्या घरी आला. यावेळी वैष्णवीचे वडील संजय गौर हे नौकरीवर तर आई बाहेरगावी गेली असल्याने सुरेश शेंडगे आणि वैष्णवी गौर यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची सुरु झाली आणि याचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि सुरेशचा रागाचा पार चढला आणि त्याने थेट वैष्णवीची गळा चिरुन हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

 

घटनास्थळाच्या जवळ आरोपी सुरेश शेंडगे हा पोलिसांना आढळून आला

खून झाल्याची माहिती घरा शेजारील लोकांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला असता  पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे, सहायक पोलीस निरीक्षक गिते, गुन्हे शोध पथकाचे भारत राठोड, बाबा गजभारे, महिला पोलीस कर्मचारी गजभारे व शेळके यांनी तातडीने आरोपीचा शोध घेतला असता यावेळी घटनास्थळाच्या जवळ आरोपी सुरेश शेंडगे हा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी सुरेश शेंडगे यास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले तेव्हा आरोपीचे कपडे देखील पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. पोलीसानी मयत वैष्णवी गौर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून , पोलीस अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी