महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, 'शिवाजी तर जुने झाले आहे', राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद पेटणार?

maharahstra governor koshyari said, shivaji maharaj has become old nitin gadkari new hero ; राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सतत कुठल्या न कुठल्या विधानावरून कायम चर्चेत असतात. दरम्यान, राज्यपालांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत येणार असल्याची शक्यता आहे. 

maharahstra governor koshyari said, shivaji maharaj has become old nitin gadkari new hero
महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यपालांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत येणार
  • 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे’. - राज्यपाल
  • पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे – राज्यपाल

औरंगाबाद  : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सतत कुठल्या न कुठल्या विधानावरून कायम चर्चेत असतात. दरम्यान, राज्यपालांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत येणार असल्याची शक्यता आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आता राज्यपालांनी नवं वक्तव्य केलं आहे. 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे’. असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नवीन काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं देखील राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे. कोश्यारी यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा ; जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा केसची रहस्य उलगडण्याची शक्यता

नेमकं काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी?

दरम्यान, राज्यपाल यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही जेव्हा शिकत होतो, तेव्हा आम्हाला विचारलं जात होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सांगायचो की, सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो पहायला मिळतील, ‘शिवाजी तर जुने झाले आहे’. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला, यावेळी राज्यपाल यांनी हे विधान केलं आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते.

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या 

पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे – राज्यपाल

पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं की, 'तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी असल्याचं देखील कोश्यारी यांनी म्हटलं आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही' असंही राज्यपाल म्हणाले.

अधिक वाचा ; नागपुरात तरुणांना वायुसेनेकडे आकर्षित करण्यासाठी एअर शो

अधिक वाचा ; एमआयएम खासदार इम्तियाज जलीलांवर पुन्हा पैशांची उधळण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी