धक्कादायक ! मलकापूरचा भोंदू महाराज विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला, प्रसादात गुंगीचे औषध देत महिलेवर केला बलात्कार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Maharaja raped the woman by giving gungi medicine : महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत लोमटे महाराजांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराजांनी महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी देखील धमकी दिली असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असून, ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली.

Maharaja raped the woman by giving gungi medicine
मलकापूरच्या महाराजाने गुंगीचे औषध देत महिलेवर केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दर्शनासाठी मठात आलेल्या एका महिलेचा चक्क महाराजानेच विनयभंग केला
  • व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी महिलेला दिली
  • एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील अनेक फसवणुकीच्या तक्रारी

उस्मानाबाद : दर्शनासाठी मठात आलेल्या एका महिलेचा चक्क महाराजानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद येथे घडली आहे. सदर, महाराजाचे नाव एकनाथ सुभाष लोमटे (Eknath Subhash Lomte) असं आहे. महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून एकनाथ लोमटे यांच्यावर येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ लोमटे यांचं राज्यभरात मोठं प्रस्थ असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांचे मोठे मठ देखील आहे.

अधिक वाचा ; ठाणे मनपा निवडणुकीसाठी ओबीसीच्या १५ जागांकरिता आरक्षण जाहीर

अशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेने सदर प्रकरणाची व्हिडीओ क्लिप महाराजांजवळ असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, महाराजांनी म्हटलं की, मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी महिलेला दिली असल्याचा दावा महिलेने केला आहे. सदर पिडीत महिला २८ जुलै रोजी मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

अधिक वाचा ; 'ओला'ने काढले 300-350 कर्मचारी, कंपनीकडून आयपीओची तयारी

महाराजांनी महिलेला दिली धमकी?

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत लोमटे महाराजांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराजांनी महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी देखील धमकी दिली असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असून, ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली. सदर प्रकाराला महिलेने तीव्र विरोध केला असता महाराजांनी तिच्या अंगावर हात टाकत शिवीगाळही केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शिष्यांची गर्दी जमा झाली, त्यानंतर महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा  ; टीम इंडियाच्या शानदार कामगिरीनंतरही भडकला रोहित, म्हणाला... 

एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील अनेक फसवणुकीच्या तक्रारी

मलकापूर येथील लोमटे महाराज हे सतत वादाच्या भवऱ्यात असतात. त्यांच्याविरोधात याअगोदर देखील  अनेक तक्रारी असल्याची माहिती मिळाली आहे. तसचं सदर प्रकरणातील महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती २८ जुलै रोजी दुपारच्या वेळी एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. यावेळी सदर प्रकार घडला असल्याचं महिलेने म्हटलं आहे.

या कलमांनुसार लोमटे महाराजांविरोधात गुन्हा

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सदर प्रकरणात लोमटे महाराजांविरोधात अनके कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  कलम ३५४, ३५४ अ, ३४१, ३२३, ५०४ व ५०६ नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी