Eknath Shinde news updates: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात औरंगाबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री १० वाजल्यानंतरही लाऊडस्पीकर सुरू ठेवत भाषण केल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra CM Eknath Shinde in trouble as a complaint filed in Aurangabad over play loudspeaker after 10 pm)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसआधी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला तसेच इतरही त्यांचे कार्यक्रम पार पडले. याच दरम्यान ३१ जुलै रोजी सिल्लोड येथील सभा संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या इतर कार्यक्रमांना उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लाऊडस्पीकरवर भाषण सुद्धा यावेळी त्यांनी केले. रात्री १० वाजल्यानंतर लाऊडस्पीकर लावण्यास तसेच भाषणास परवानगी नाहीये मात्र, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबादेत क्रांतीचौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतादरम्यान रात्री दहा वाजेनंतर लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी मुख्यमंत्री व आयोजकाविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. pic.twitter.com/oOW9G2YRbf — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 2, 2022
औरंगाबादेत क्रांतीचौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतादरम्यान रात्री दहा वाजेच्यानंतर लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि आयोजकांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आनंद ज्ञानदेव कस्तुरे असे तक्रारदाराचे नाव आहे.
अधिक वाचा : CM Shinde: मंत्रालयात सत्यनारायण पूजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 आणि 31 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 31 जुलै रोजी सिल्लोड येथील सभा आटोपून त्यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर रात्री क्रांतीचौक येथे त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील शिंदे गटातील सर्वच आमदार तसेच कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात भरगच्च कार्यक्रम असल्याने क्रांतीचौकात यायला मुख्यमंत्र्यांना रात्र झाली. साधारण दहा ते साडेदहाच्या दरम्यान मुख्यमंत्री क्रांतीचौकात पोहोचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बराच वेळ स्वागत चालला. दहावाजेच्यानंतर स्वागतादरम्यान लाऊडस्पीकर वाजविण्यात आले यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला अशी तक्रार कस्तुरे यांनी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत केली आहे.