शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याला ईडीचा दणका, तब्बल एवढ्या कोटीची मालमत्ता जप्त

Shiv Sena's big leader hit by ED : राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर (ex minister arjun khotkar) यांच्यावर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली

Maharashtra: ED attaches Rs 78 crore assets of mill controlled by Jalna Shiv Sena ex-minister Arjun Khotkar
शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याला ईडीचा दणका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अर्जुन खोतकर यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली
  • विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे – ईडी
  • हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत. – अर्जुन खोतकर

जालना : राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर (ex minister arjun khotkar) यांच्यावर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने तब्बल खोतकर यांची ७८ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ३७ पेक्षा जास्त आमदार घेऊन जात शिवसेनेसोबत बंडखोरी केली असल्याने शिवसेने अडचणीत आली आहे. यातच आता ईडीच्या वतीने शिवसेनेच्या नेत्यांविरोधात अशी कारवाई करण्यात येत असल्याने शिवसेना आता पुरती अडचणीत येत आहे.

अधिक  वाचा : फायनलमध्ये MP मजबूत स्थितीत, पहिला किताब जिंकण्याची संधी

विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे – ईडी

दरम्यान, ईडीच्या वतीने अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर करखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. हा कारखाना अवघ्या ४२ कोटी ३१ लाख रुपयांना विकण्यात आला. मात्र त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत ७८ कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान,या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाला असल्याचा गंभीर आरोप देखील ईडीकडून करण्यात आला आहे. थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे, या प्रकणात कारवाई केली गेली आहे.

अधिक वाचा : कॉलेज ड्रॉपआऊट ते कोट्यधीश, गौतम अदानींचा थरारक प्रवास  

हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत. – अर्जुन खोतकर

या प्रकरणात अर्जुन खोतकर यांच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. साखर कारखान्याची संपत्ती जप्त केली आहे. याविरोधात आपण कोर्टात दाद मागणार आहोत. असं अर्जुन खोतकर म्हणाले.  त्याचबरोबर हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत. सध्या राजाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने आमदारांनी पळ काढल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

अधिक वाचा : टाटा नेक्सॉनला आग लागण्याच्या घटनेनंतर सरकार करणार कारवाई

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी