भाजपच्या जलआक्रोश मोर्चावेळी आला पाऊस अन देवेंद्र फडणवीस म्हणाले......

maharashtra ex cm devendra fadanvis on thakrey goverment : जालन्याचा पाणी प्रश्न रावसाहेब दावनेंच्या नेतृत्वास सोडवून दाखवू चालू कामं बंद करण्याचं एवढंच काम सरकार करतं आहे. ठाकरे सरकारला मिरवण्यासाठी सिंहासन दिलं नाही तर जनतेचं काम सोडविण्यासाठी सिंहासन दिलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांची म्हटलं आहे. - देवेंद्र फडणवीस

maharashtra ex cm devendra fadanvis on thakrey goverment
जलआक्रोश मोर्चावेळी आला पाऊस अन देवेंद्र फडणवीस म्हणाले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालना येथे पाणीप्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता
  • देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना अचानकपणे पाउस आला
  • फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही पण ईश्वराने पाणी दिलं

जालना : भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालना येथे पाणीप्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक कार्यकर्ते आणि शहरातील लोकं आले होते. या मोर्चाचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना अचानकपणे पाउस आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सरकारला टोला लगावत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही ईश्वराने पाणी दिलं.. पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही, मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला, पहिल्यांदा सांगितलं की ही योजना रद्द केली नाही, नंतर एकही रुपयाचा निधी दिला नाही. मुख्यमंत्री कार चालवतात, अन् भगवान सरकार चालवतं, ईश्वर भरोसे चाललं आहे. असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये मोठा गोंधळ, ट्रेनवर केली दगडफेक

ठाकरे सरकारला मिरवण्यासाठी सिंहासन दिलं नाही – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालन्याचा पाणी प्रश्न रावसाहेब दावनेंच्या नेतृत्वास सोडवून दाखवू चालू कामं बंद करण्याचं एवढंच काम सरकार करतं आहे. ठाकरे सरकारला मिरवण्यासाठी सिंहासन दिलं नाही तर जनतेचं काम सोडविण्यासाठी सिंहासन दिलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांची म्हटलं आहे.

अधिक वाचा : VIdeo: टी-२० आहे की कसोटी?  कर्णधार बेन स्टोक्सने लावली आग

महाविआ सरकारने वैधानिक विकास महामंडळाची हत्या केली – देवेंद्र फडणवीस

महाविआ सरकारने वैधानिक विकास महामंडळाची हत्या केली. सरकारमध्ये अनेक मराठवाड्याचे मंत्री आहे. पण एकाही मंत्र्यांने तोंड उघडलं नाही. कारण हे तिन्ही पक्षातील नेते सत्तेत खूश आहेत. यांचे खिसे भरायचे चालले आहेत. यांना जनतेचं काही देणंघेणं नाही. असही फडणवीस म्हणाले.  आजचा मोर्चा म्हणजे सरकारला एक चॅलेंज आहे. आम्ही सरकारला झोपू देणार नाही, एक-एक दिवस तुमचा भारी करु, जोपर्यंत सामान्य माणसाला तु्म्ही पाणी देत नाही. जोपर्यंत रोज नळाला पाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी जालनाकराना दिला आहे.

अधिक वाचा : फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल 

सगळ्या पाण्याच्या योजनांची ठाकरे सरकारने हत्या केली – फडणवीस

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, जर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना झाली असती तर मराठवाड्यात कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नसती, हे सरकार पाण्याचा शत्रू आहे. सगळ्या पाण्याच्या योजनांची ठाकरे सरकारने हत्या केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी