Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Major accident during bharat Jodo Yatra, one dead : नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडो यात्रेचे आगमन झाले. या यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

Major accident during bharat Jodo Yatra, one dead
भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली
  • आयचर ट्रकने भारत जोडो यात्रेतील दोघांना जोराची धडक दिली
  • या धडकेत एका यात्रेकरूचा जागीच मृत्यू झाला आहे

नांदेड : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेला’ प्रत्येक राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे. ‘भारत जोडो यात्रा’ केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर आता महाराष्ट्रातील नांदेडमध्ये दाखल झाली आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडो यात्रेचे आगमन झाले. या यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आयशर ट्रकने भारत जोडो यात्रेतील दोघांना जोराची धडक दिली. या धडकेत एका यात्रेकरूचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी एक यात्रेकरू हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा ; किरीट सोमय्या रत्नागिरी दौर्‍यावर, पोलिसांसमोर जबाब नोंदवणार

घटनेतील मयत व्यक्ती हा तामिळनाडूचा राहिवाशी

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव हे गणेशन असं होतं. गणेशन हे 62 वर्षाचे होते. त्याचबरोबर ते तामिळनाडू राज्याचे होते अशी देखील माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातात सयसूल नामक व्यक्ती जखमी झाली असून, त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात हा नांदेड - नागपूर मार्गावरील पिंपळगाव जवळ गुरुवारी रात्री झाला आहे. राहुल गांधी यांची सभा आटोपून यात्रेकरू मुक्काम स्थळी जात होते. मात्र, पिंपळगावजवळ एका भरधावत आयचरने दोघांना धडक दिली असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कृष्ण कुमार पांडे नावाच्या एका पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. नांदेडमध्ये पाच दिवसात दोन वेगवेळ्या घटनांमध्ये दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा ; काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड  

राहुल गांधी यांनी पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुकवरून मयत गणेशन श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'ते काँग्रेसचे कटिबद्ध कार्यकर्ते होते, त्यांनी गेल्या ३ दशकात पक्षाच्या प्रत्येक यात्रेत आणि प्रचारात भाग घेतला होता. दरम्यान आज पदयात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी आणि भारत यात्रींनी मयत गणेशन यांना श्रद्धाजली दिली आहे. त्याचबरोबर राहूल गांधी यांनी गणेशन यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

अधिक वाचा ; तुरुंगातून बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक, राऊतांच्या मनात काय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी