Beed Self Immolation : बीड : आज बीडमध्ये पोलीस मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. विनोद शेळके असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे.
आज बीडमध्ये पोलीस मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.संपूर्ण बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://t.co/T39QVNzMmP pic.twitter.com/eZp3NeUVCO — Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 26, 2022
आज बीडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानत ध्वजारोहणासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे आले होते. तेव्हा विनोद शेळके हे या मैदानात पोहोचले आणि त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी शेळके यांना ताब्यात घेतले आणि पुढचा अनर्थ टळला. विनोध शेळके यांच्या मालकीचे बीडमध्ये एक दुकान आहे. बीड पालवन रोड ते पिंपळवाडी या रस्त्याचे काम बोगस पद्धतीन झाले आहे, तसेच या कामात भ्रष्टाचार झाला असून शेळके यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले. या रस्त्याच्या कंत्राटदारावर कारावाई व्हावी अशी त्यांची मागणी होती, यासाठीच त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.