Jalna : स्टील कारखान्यात बाॅयलरचा स्फोट; 10 कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीररित्या जखमी

Massive explosion in steel company, 10 workers killed ; स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला होऊन एक – दोन नव्हे तर तब्बल 10 कामगारांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना सकाळच्या सुमारास घडली असून, औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे.

Massive explosion in steel company, 10 workers killed
स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट, 10 कामगारांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला होऊन एक – दोन नव्हे तर तब्बल 10 कामगारांचा मृत्यू
  • औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट
  • सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने भीषण स्फोट

जालना : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला होऊन एक – दोन नव्हे तर तब्बल 10 कामगारांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना सकाळच्या सुमारास घडली असून, औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  जे कामगार गंभीररित्या भाजले गेले आहेत. यामध्ये काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक वाचा ; Remedies for PCOD: जाणून घ्या PCOD ची लक्षणे आणि उपचार

सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने भीषण स्फोट

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान, अशा घटना सतत घडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपनी मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज घडलेल्या या घटनेत देखील अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे तर, अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा ; भारत-बांगलादेश सामन्याआधी शाकीबच्या विधानाने मोठी खळबळ 

प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार – सामाजिक कार्यकर्ते

सुरक्षतेची काळजी न घेणाऱ्या कंपन्यांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. आणि याचाच परिणाम म्हणून कामगारांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येते. प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा : कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी