MHADA Lottery 2023 Registration: औरंगाबादमध्ये 936 घरांसाठी लॉटरी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात, PM आवास योजनेची 605 घरे, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत अन् इतर माहिती

MHADA Lottery 2023 Registration : आपल्या स्वत:चं आणि हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, म्हाडाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व माहिती....

MHADA aurangabad Lottery 2023 application starts check price location notification pdf apply online at mhada gov in
औरंगाबादमध्ये 936 घरांसाठी लॉटरी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात, PM आवास योजनेची 605 घरे, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत अन् इतर माहिती 

MHADA Lottery 2023 Registration in Marathi: आपलं स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, घरांच्या किमती लक्षात घेता हे सर्वसामान्यांना खरेदी करणं अवाक्याच्या बाहेर होतं. हेच लक्षात घेत सर्वसामान्यांना परवाडणाऱ्या सदनिका, गाळे, निवासी भुखंडाच्या विविध योजने अंतर्गत विक्री करण्यात येते. म्हाडाच्या औरंगाबाद विभागाने सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या औरंगाबाद विभागात नेमकी किती घरे आहेत, या घरांच्या किमती, ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि इतर माहिती जाणून घेऊयात... (MHADA aurangabad Lottery 2023 application starts check price location notification pdf apply online at mhada.gov.in)

किती घरांसाठी सोडत?

पंतप्रधान आवास योजना (PMAY) आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत सदनिका एकूण 936 यांच्या विक्रीसाठी औरंगाबाद मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MHADA Aurangabad Lottery 2023 notification PDF

MHADA Aurangabad Lottery 2023 booklet pdf औरंगाबाद मंडळ सोडत फेब्रुवारी, 2023 साठी सदनिकांच्या विक्रीसाठी माहिती पुस्तिका

MHADA Aurangabad Lottery Important Dates: सोडतीसाठी महत्त्वाच्या तारखा

  1. सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीची सुरुवात - 7 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून
  2. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात - 9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता
  3. ऑनलाईन पेमेंट स्विकृती सुरुवात - 9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता
  4. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ - 10 मार्च 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
  5. ऑनलाईन पेमेंट स्विकृती दिनांक - 11 मार्च 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
  6. बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक - 13 मार्च 2023 (संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
  7. सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी - 16 मार्च 2023 सायंकाळी 6 वाजता
  8. सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 18 मार्च 2023 सायंकाळी 6 वाजता

हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट

MHADA Aurangabad Lottery Date

सोडत दिनांक -  22 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता.

सोडतीचे स्थळ - मराठवाडा महसुल प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरप्रीत हॉटेल जवळ, औरंगाबाद

हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय

अ - पंतप्रधान आवास योजना 

अत्यल्प उत्पन्न गट (EWS)- एकूण घरे 605

कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा - 25,000 रुपयांपर्यंत

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 5,000 रुपये 

अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 5590 रुपये

हे पण वाचा : तुम्हाला सुद्धा नखे चावण्याची सवय आहे का? मग हे वाचाच

ब - म्हाडा गृहनिर्माण योजना

अत्यल्प उत्पन्न गट (EWS) - एकूण घरे - 38

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 5,000 रुपये 

अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 5590 रुपये

हे पण वाचा : मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होते?

अल्प उत्पन्न गट (LIG) - एकूण घरे - 65

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 10,000 रुपये 
अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 10,590 रुपये

मध्यम उत्पन्न गट (MIG) - एकूण घरे 151

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 15,000 रुपये 

अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 15,590 रुपये

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

उच्च उत्पन्न गट (HIG) - एकूण घरे - 3

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 20,000 रुपये 

अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 20,590 रुपये

सर्व उत्पन्न गट - एकूण घरे - 74

या गटाची उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. 

अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम - 10,000 रुपये 

अर्जाची किंमत 500 रुपये + GST रुपये 90 = एकूण 590 रुपये विनापरतावा) एकूण 10,590 रुपये

हे पण वाचा : ही लक्षणे दिसल्यास समजून जा तुम्हाला लिव्हरची समस्या आहे

How to apply MHADA Lottery 2023

म्हाडाच्या औरंगाबाद विभागातील लॉटरीच्या संबंधित सविस्तर जाहिरात, आरक्षण निहाय तपशिल, माहितीपुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

गटनिहाय उत्पन्न मर्यादा

उत्पन्न गट  सुधारीत कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक) सुधारीत कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक)
उत्पन्न गट कमाल उत्पन्न मर्यादा (औरंगाबाद शहर तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्राकरीता)  कमाल उत्पन्न मर्यादा (10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्राकरीता) 
EWS / LIG / MIG / HIG रुपये 6,00,000 रुपयांपर्यंत रुपये 4,50, 000 रुपयांपर्यंत
LIG / MIG / HIG रुपये 9,00,000 रुपयांपर्यंत रुपये 7,50,000 रुपयांपर्यंत
MIG / HIG रुपये 12,00,000 रुपयांपर्यंत रुपये 12,00,000 रुपयांपर्यंत
HIG कमाल मर्यादा नाही कमाल मर्यादा नाही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी