MHADA exam paper leak । पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीचं आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर पुन्हा एकदा मोठी घटना घडली होती. ती म्हणजे म्हाडाच्या परीक्षेचा देखील पेपर फुटला होता. म्हाडाच्या पेपरफुटी नंतर पोलिसांनी औरंगाबाद येथील ३ क्लासेस चालकांना अटक केली होती. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड वापरत होते. त्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. (MHADA exam paper leak new information found by police )
घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर घरातील वस्तू कधी मिळणार? याचा अर्थ आहे फुटलेला पेपर कधी मिळणार. हे कोडवर्ड जरी तुम्हाला खरे वाटत नसले तरी हे वाक्य एक कोडवर्ड म्हणून वापरण्यात आले होते. म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणासाठी आरोपी आणि उमेदवारांमध्ये झालेल्या संभाषणामध्ये हा कोडवर्ड वापरण्यात आला आहे.
विशेष म्हणजे घडले असे की, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना अनेक उमेदवारांचे फोन आले होते. पोलिसांनी त्यांना उमेदवारांशी बोलण्यास सांगितलं तेव्हा अनेक उमेदवार हे घरातील वस्तूचे काय झालं? असा प्रश्न त्यांना विचारत होते. उमेदवार नेमक काय विचारताहेत, ते ऐकून पोलीसही चक्रावले होते. पहाटे दोन वाजता देखील अंकुश आणि संतोष हरकळ या यांच्या संपर्कात अनेक उमेदवार होते. विशेषतः याबाबत त्यांनी जेव्हा आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा, ते वाक्य कोडवर्ड असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी सांगितले आहे.
आरोपी आपापसात कोडवर्डमध्ये बोलत असल्याचं तपासात समोर तसंच मोबाइलवर संभाषण करताना कोडवर्डच्या भाषेत बोलायचे. त्याचंबरोबर तपासात आणखीन काही पेन ड्राईव्ह सापडले असल्याचं पोलीस आयुक्त यांनी म्हटलं आहे. म्हाडा पेपर रद्द प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी तीन जणांना अटक करणार आहे. सर्वांच्या घराची झाडाझडती देखील घेतली आहे.
दरम्यान, या परिक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ.प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणलं. देशमुखला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमानं स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे.
सदर पेपरफुटी प्रकरणात आरोपी असलेला डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुशयांच्या बरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. याची देखील माहिती उघड झाली आहे. सदर घटनेनंतर तिघेही सोबतच होते. आणि एकाच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले असता त्यांच्याकडे पेपर आणि पेनड्राईव्ह आढळून आले आहे.