पेपरफुटी प्ररणात औरंगाबादेतील तीन क्लासेस चालकांचा पर्दाफाश; धक्कादायक वास्तव आलं समोर , औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ

mhada exam paper racket three classes owner arrested : सदर पेपरफुटी प्रकरणात  आरोपी असलेला डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुशयांच्या बरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. याची देखील माहिती उघड झाली आहे

mhada exam paper racket three classes owner arrested
पेपरफुटी प्ररणात औरंगाबादेतील तीन क्लासेस चालकांचा पर्दाफाश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • परिक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होते.
  • तिघेही सोबतच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी पकडले
  • सदर घटनेमुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Mhada Paper Leak : औरंगाबाद : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात गेली काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. यामध्ये आता  एक मोठा खुलासा झाल्याची माहिती मिळाली आहे. सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे हे आणि विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय नंदू चव्हाण हे औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि त्यांच्या अकॅडमी मधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. सदर घटनेमुळे औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

परिक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होते.

दरम्यान, या परिक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ.प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणलं. देशमुखला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमानं स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे.

तिघेही सोबतच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी पकडले

सदर पेपरफुटी प्रकरणात  आरोपी असलेला डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुशयांच्या बरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. याची देखील माहिती उघड झाली आहे. सदर घटनेनंतर तिघेही सोबतच होते. आणि एकाच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले असता त्यांच्याकडे पेपर आणि पेनड्राईव्ह आढळून आले आहे.

यांना केले आहे म्हाडाच्या फुटीप्रकरणात मुख्य आरोपी?

चिकलठाण्यातील मिलेनियक पार्क मध्ये राहणारे, नोकरी करणाऱ्या संतोष लक्ष्मण हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ यांच्या मदतीने हे पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. यात रविवारी पोलिसांनी हरकळला अटक केली. त्याचबरोबर, शहरातील टार्गेट अकॅडमीचा अजय नंदु चव्हाण , सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे यांना देखील म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी केले आहे. यापुर्वी ते आरोग्य विभागाच्या घोटाळ्यात देखील आरोपी आहेत. 

चव्हाण शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतो

 चव्हाण हा मूळ लोणारचा आहे. चव्हाणनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून गणित, फिजिक्स विषयात शिक्षण घेतले. सुरूवातीला खासगी क्लासेसवर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या चव्हाणनं कालांतरानं टीव्ही सेंटर परिसरात ‘द टार्गेट करिअर पाँईट’ हा क्लास सुरू केला. त्याचंबरोबर गेल्या दहा वर्षांपासून चव्हाण शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतो. असलेला १ डिसेंबरपासून आगामी १३ हजार पोलीस भरतीच्या पदांसाठी त्याने स्पेशल बॅच देखील नियोजित केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी