उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एमआयएम, भाजप आक्रमक, ‘जिथे वृत्ती रझाकारी तिथे शिवसेना वार- करी’ शिवसेनेने लावले पोस्टर

MIM, BJP aggressive before Uddhav Thackeray's meeting : शिवसेनेचे हिंदूत्व हे भाजप आणि मनसेपेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक असल्याचे संदेश देण्याची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेनेने ‘एमआयएम’ हा पक्ष रझाकाराशी संबंध असल्याचा आरोप गंभीर आरोप केला आहे.

MIM, BJP aggressive before Uddhav Thackeray's meeting
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एमआयएम, भाजप आक्रमक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोगलांच्या व निजामाच्या ४०० वर्षांपूर्वीच्या पराभवाचे खापर आता मुस्लिमांवर फोडणे चुकीचे
  • शिवसेनेचे हिंदूत्व हे भाजप आणि मनसेपेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक - शिवसेना
  • रझाकाराशीही आमचा संबंध नाही – इम्तियाज जलील

Uddhav Thackeray's meeting : औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जून रोजी औरंगाबाद येथे भव्य मोठी सभा आहे. या सभेची तैयारी देखील शिवसेनेने जोरात केली आहे. दरम्यान, सभेच्या २ दिवसापूर्वी शिवसेनेनकडून हिंदूत्वाचा नारा अधिक उंचावला जाईल असे संकेत देण्यात आले आहेत. तर, सभेपूर्वी फलक देखील लावण्यात आले आहेत. ‘होय हे संभाजीनगरच’., ‘ जिथे वृत्ती रझाकारी तिथे शिवसेना वार- करी’ असे फलक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी लावण्यात आले आहेत. तर,दुसरीकडे एमआयएम आणि भाजप शिवसेनेला घराण्याच्या तयारीत आहे. पाणी प्रश्नावरून आणि विकासाच्या मुद्दयावरून घेरण्याची तयारी भाजप आणि एमआयएमकडून केली जात आहे.

अधिक वाचा ; तहान लागली अन् लंपास झालं तब्बल ३० लाखांचं सोनं, व्हिडीओ

शिवसेनेचे हिंदूत्व हे भाजप आणि मनसेपेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक 

शिवसेनेचे हिंदूत्व हे भाजप आणि मनसेपेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक असल्याचे संदेश देण्याची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेनेने ‘एमआयएम’ हा पक्ष रझाकाराशी संबंध असल्याचा आरोप गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, सभेपूर्वी लावण्यात आलेले पोस्टर लावण्यात आले आहेत, या फलकावर, ‘होय , हे संभाजीनगरच ’असं लिहिण्यात आल आहे. शिवसेनेने लावलेले हे फलक औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणण्याची तयारी सुरू केली असली तरी मुख्यमंत्र्याचे या संदर्भातील वक्तव्य त्यांना अडचणीत आणणारे ठरू शकेल. अशी चर्चा सुरु झाली आहे.

अधिक वाचा : यंदा या दिवशी साजरा होणार गंगा दसरा महोत्सव, वाचा सविस्तर

मोगलांच्या व निजामाच्या ४०० वर्षांपूर्वीच्या पराभवाचे खापर आता मुस्लिमांवर फोडणे चुकीचे

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मोगलांच्या व निजामाच्या ४०० वर्षांपूर्वीच्या पराभवाचे खापर आता मुस्लिमांवर फोडणे चुकीचे असल्याचं मत जलील यांनी म्हटलं आहे. केलेली कृती आणि व्यक्त केलेली भूमिका यातील विरोधाभास कळ काढून पळून जाणारी असल्याची टीकाही होत आहे.

अधिक वाचा   ; फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका असे कलिंगड, वाचा सविस्तर 

रझाकारांशी आमचा संबंध नाही – इम्तियाज जलील

औरंगजेब एमआयएमचा आदर्श नाही तसेच रझाकाराशीही आमचा संबंध नाही, अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली. खुलाताबाद येथे औरंगजेबच्या कबरीवर भगवा फेटा घालून नतमस्तक होणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर रझाकाराची मानसिकता व वृत्ती असल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली असून, यावर एमआयएमने उत्तर दिले आहे. तत्पूर्वीच नतमस्तक होण्याची ती कृती केवळ मुस्लीम रिवाजाचा भाग होता. असंही जलील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी