Asaduddin Owaisi लातूर : राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा असं अशी भूमिका असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केली असल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजपने आपला एक अतिरिक्त उमेदवार उमेदवार उभा केल्याने सदर निवडणूक की अटीतटीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे.
अधिक वाचा : ५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल, या लोकांची वाढणार डोकेदुखी
राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने देखील मोठी तयारी सुरु केली आहे. मधल्या काही काळात मतांची जुळवाजुळव करण्यसाठी शिवसेनेने एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. यावर, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी खुद्द आपली भूमिका मांडली आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आतापर्यंत महाविकासआघाडीचे आमच्याशी काहीही बोलणे झाले नाही. आता आंम्ही बघणार आहोत की आम्हाला ते कधी संपर्क करणार आहेत. त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. जर त्यांना आमची गरज नसेल तर काही हरकत नाही असंही ओवैसी म्हणाले.
अधिक वाचा : नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको गेली सोडून
२० जून रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. या १० जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. तर, भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही ज्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहतील त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची तजवीज करावी लागणार आहे. दरम्यान, भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ ११३ इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात.
अधिक वाचा : यंदा या दिवशी साजरा होणार गंगा दसरा महोत्सव, वाचा सविस्तर