'हा तर औरंगजेबाच्या विचारांचा पक्ष...', शिवसेना आक्रमक; जलीलही मागे हटण्यास तयार नाही!

औरंगाबाद
रोहित गोळे
Updated Jul 12, 2022 | 15:10 IST

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केल्यानंतर आता यावरुन शिवसेना आणि एमआयएम आमनेसामने आले आहेत. पाहा दोन्ही पक्षाचे नेत्यांचं नेमकं काय आहे म्हणणं.

mim is party of aurangzeb thoughts shiv sena aggressive criticism
'हा तर औरंगजेबाच्या विचारांचा पक्ष...', शिवसेना आक्रमक 
थोडं पण कामाचं
  • औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चिघळणार
  • नामांतराविरोधात एमआयएमसह इतर संघटनांकडून मूक मोर्चा
  • एमआयएम औरंगाबाजाच्या विचारांचा पक्ष, शिवसेनेची टीका

संभाजीनगर: औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. याच निर्णयाला आज एमआयएमने काही मुस्लिम गटांना एकत्र करून मूक मोर्चा काढून निषेध करत आहे. यावरून लक्षात येते की एमआयएम ही औरंगजेब यांच्या विचारायची आहे. अशी टीका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

'ज्या औरंगजेबाने हिंदूंचे मंदिरे तोडली, धर्मवीर संभाजी महाराज यांचे हाल करून वध केला. आशा औरंगजेबाचे नाव शहराला कशासाठी? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा एमआयएमचा आम्ही निषेध करतो. खासदार इम्तियाज जलील ही राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा विरोध करत आहेत.' असा आरोप अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

अधिक वाचा: हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन..., उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी मतदान घेण्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाली की, खासदार जलील हे काय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहे का? की त्यांनी मागणी केली म्हणून ती पूर्ण करावी. असा टोलाही आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे.

हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचीही टीका  
 
दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष संजय किणीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'खासदार जलील यांचा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा हेतू आहे. ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.' अशी टीका संजय केणेकर यांनीही केली आहे. 

अधिक वाचा: हरवलेले हिंदुत्त्व परत आणण्यासाठी शिवसेना लावणार औरंगाबाद नामांतराचा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता 

'एकीकडे खासदार इम्तियाज जलील औरंगाबादच्या नावासंदर्भात आम्हाला काही घेणे देणे नाही असे वक्तव्य करणारे खासदार आज नामांतराच्या विरोधात मोर्चा का काढत आहे?' असा प्रति प्रश्न भाजपाचे संजय केनेकर यांनी केला आहे. 

हा खासदार जलील यांच्या राजकीय स्टंट असून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न खासदार यांच्या जलील करत असल्याची टीकाही संजय केणेकर यांनी केली आहे.

आमचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध: इम्तियाज जलील

या सगळ्याबाबत इम्तियाज जलील आपली भूमिका मांडताना म्हणाले की, 'आम्ही काही औरंगजेबाचे भक्त नाही, मात्र औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा घाट हा मोठी शिवसेना, छोटी शिवसेना आणि भाजप यांचा आहे.'

अधिक वाचा: औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करणार 

'मात्र या निर्णयामुळे औरंगाबादकरांचे विचार लक्षात घेण्यात आलेले नाही. शहरात एखादी दारूची दुकान सुरू किंवा बंद करायची असेल तर निवडणूक घेतात मग हा तर औरंगाबादकर यांचा जिवाभावाचा प्रश्न आहे. यासाठीही राज्य सरकारने निवडणूक घ्यावी. त्यानंतर जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे.' असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहे. 

औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर सर्व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बदल करण्याचा खर्च उद्धव ठाकरे देणार आहे का? आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट, हे सर्व बदल करावे लागणार याचा खर्च कोण करणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

शिवसेना-भाजप यांच्या वतीने औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाला विरोध करत असताना आम्हाला धमक्या देण्यात येत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. असंही खासदार जलील यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी