Imtiaz jaleel : औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बहुजन आघाडीसह एम आय एम वरती गंभीर आरोप केले होते. आता एमआयएमने देखील चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. एमआयएमचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी खैरे यांचा समाचार घेतला आहे.शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, भाजपने एमआयएमला एक हजार कोटी दिल्य़ाचा गंभीर आरोप केला होता.
जलील यांनी खैरे यांच्या आरोपाला उत्तर देत म्हटलं आहे की, खैरे आता फक्त मनोरंजन झालं आहे. भाजपने पैसे दिले तर खैरे यांनी त्याची ईडीकडे तक्रार करावी आणि कायदेशीर कारवाई करावी, तसंच खैरे खोटं असल्याचंही जलील म्हणाले. पुढे बोलताना जलील म्हणाले की, 'होय आम्हाला पैसे दिले मात्र, १ हजार कोटी नव्हे तर १० हजार कोटी दिले आहेत. ते दहा हजार कोटी घेऊन स्वतः खैरेसाहेब माझ्याकडे आले होते. मात्र, त्यामध्ये ५०० च्या ४ नोट कमी होत्या, हे मी खैरेंना सांगितलं तर ते म्हणाले, ते पैसे मी चहापणासाठी वापरले, 'मी त्यांना म्हणालो, माझ्या ५०० च्या ४ नोटा परत दिल्या नाहीत, तर मी खैरे यांची सीबीआय आणि ईडी कडे तक्रार करणार आहे.' असं जलील यांनी म्हटलं आहे.