औरंगाबाद : राज्य सरकारने सुपरमार्केट आणि मॉलमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. सदर निर्णय हा राज्यमंत्री मंडळ्याच्या बैठकीत (Cabinet meeting) नुकताच घेण्यात आला असून, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे टीका होऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टीने तर महाविकास आघाडी सरकारवर राज्यभरातून टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर शिवसेनेला देखील धारेवर धरण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, काही कॉंग्रेसनेत्यांनी या निर्णयाची निंदा केली असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून एमआयएम मात्र आक्रमक झाल्याचं पहायाला मिळत आहे. या निर्णयाअंतर्गत औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार, असल्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. जलील यांनी घेतलेल्या टोकाच्या या निर्णयानंतर पुढे काय घडत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : काळा अर्थसंकल्प, पंतप्रधानांनी मागितलेली माफी, विविध मुद्दे
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतं असून, मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे.
अधिक वाचा : भारताचे सर्वात जबरदस्त, दिशा बदलणारे ऐतिहासिक 7 अर्थसंकल्प
दरम्यान , पुढे बोलताना खासदार इम्तियाज जलीलम्हणाले की, आया बहिणींनी पुढे येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजेत. सरकारच्या या वाईन धोरणाविरोधात लढा देण्यास महिला वर्गालाही आवाहन केले आहे. भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू. असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
अधिक वाचा : विराट कोहलीने सोडले होते कर्णधारपद, आता खुद्द केलाय खुलासा