Imtiyaz Jaleel : औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ८ जून रोजी औरंगाबाद येथे भव्य सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला पोलिसांकडून रितसर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी औरंगाबाद येथे सभेचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेतली होती. राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमली होती. राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भव्य सभा होणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ८ जूनच्या सभेनंतर आमची सुद्धा सभा होणार असल्याचा इशारा एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. तसेच आमची सभा 'सौ सुनार की एक लोहार की' अशी असणार असल्याचा टोलाही जलील यांनी विरोधकांना लगावला आहे.
अधिक वाचा ; जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर
मनसे प्रमुख राज ठाकरें यांची जाहीर सभा औरंगाबाद येथे झाल्यानंतर लगेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा 'जल आक्रोश मोर्चा' औरंगाबाद येथे काढण्यात आला. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर राजकीय आखाडा बनला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, या सभेनंतर लगेच एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सुद्धा जाहीर सभा होणार असल्याची माहिती औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता औरंगाबाद शहर राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
अधिक वाचा ; या ३ राशींची मुले असतात चांगली मुले आणि जावई, जिंकतात मने
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना इम्तीयाज जलील म्हणाले की, आम्हाला कुठे गावात फिरून लोकांसाठी गाड्यांची सोय करून द्यावी लागणार नाही. कुठेही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे सगळ्यांच्या सभा होऊ द्या त्यांनतर शेवटी आमची सभा होईल असं जलील म्हणाले. मी म्हणालो होतो सगळ्यांचं होऊ द्यात मग आमचं 'सौ सुनार की एक लोहार की रेहेंगी', त्याचं होऊ द्या त्यांनतर आमची शंभर टक्के सभा होणार असल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे. ६ जूनला ओवैसी नांदेडमध्ये असणार त्या ठिकाणी किंवा 7 जूनला त्यांची लातूर येथे सभा होणार असून, त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ असे जलील म्हणाले.
अधिक वाचा ; गौतम अदानी जगातील 8व्या क्रमांकाचे श्रीमंत तर अंबानी 11व्या