औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. दानवे यांनी अनेकवेळा म्हटलं आहे की, बाबरी मशीद पडली तेव्हा मी अयोध्येत होतो. मात्र, यावेळी शिवसैनिक त्या ठिकाणी कुठेच दिसले नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मोठा दावा केला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, बाबरी पडली तेव्हा दानवे हे माझ्यासोबत सिल्लोडला होते. ते अयोध्येला गेले नव्हते. त्यामुळे सत्तार यांनी केलेल्या दाव्यामुळे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्याची हवाच काढून घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या दोन्ही दाव्यामुळे नेमक खर कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे.
अधिक वाचा ; विमान, ट्रेन, बस किंवा कारमधील सर्वात सुरक्षित सीट कोणत्या?
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणीस यांनी आपण बाबरी मशीद पडायला गेलो होतो असा दावा केला होता. जेव्हा बाबरी मशीद पडली तिथे उपस्थित नव्हता असेही फडणवीस यांनी म्हटलं होतं. मी वयाच्या २० व्या वर्षी नगरसेवक झालो होतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय? बाबरी मशीद पडली तेव्हा तुमचे वय काय होते का शाळेची सहल होती का? असं म्हणत तुमच्यावर ज्ञानेश बाबरी मशीद पडली असती असा टोला देखील देखील लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेना डिवचत म्हटलं होतं की मी स्वतः बाबरी पडली तेव्हा अयोध्येत उपस्थित होतो शिवसेनेचा एकही कार्यकर्ता अयोध्येत उपस्थित नसल्याचे देखील दानवे यांनी म्हटलं होतं.
अधिक वाचा ; लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हज
दरम्यान पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटले आहे की, आघाडी सरकार सध्या स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समुद्राप्रमाणे स्थिर आहेत. मुख्यमंत्री यांची बदनामी कोणी करू नये, अन्यथा जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त करू. त्याचबरोबर शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. राणा दाम्पत्यांची मुख्यमंत्र्यांसमोर उभे राहण्याची देखील लायकी नाही त्यांची किंमत चाराण्याची ही नाही. त्यांना पळता भुई कमी पडेल, असं म्हणत अब्दुल सत्तार शेख यांनी राणा दांपत्यांना इशारा दिला आहे.
अधिक वाचा ; शिक्षकावर ७५ विद्यार्थिनींच्या शोषणाचा आरोप, शिक्षकाला अटक