अखेर 'त्या' शिवसैनिकाच्या पत्नीला एकनाथ शिंदेंकडून मोठी मदत

minister eknath shinde donates rs 5 lakh to the wife of a dead Shiv Sainik : बीडच्या एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी तिरुपतीला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

minister eknath shinde donates rs 5 lakh to  the wife of a dead Shiv Sainik
अखेर 'त्या' शिवसैनिकाच्या पत्नीला एकनाथ शिंदेंकडून मोठी मदत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले
  • मरेपर्यंत शिवसेनेची सेवा करणाऱ्या दिगंवत शिवसैनिकाच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती मदत
  • एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती

Shivsainik Sumant Ruikar । बीड : आपल्या लाडक्या नेत्याला म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे एक शिवसैनिक तिरुपतीला जात होता. मात्र, रस्त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना काही २ दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, आपला कार्यकर्ता आपल्यासाठी इतक्या लांब पर्यंत चालत जात असताना त्याच्यासोबत झालेल्या घटनेची दखल आता शिवसेनेन घेतली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला शिवसेनेकडून मदतीचा मोठा हात मिळाला आहे.

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंत रुईकर यांच्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी घेतली असून आज प्राथमिक स्वरूपात त्यांना पाच लाख रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे. . इतकंच नाहीतर लवकरच घर देखील बांधून देण्यात येईल असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मंत्री शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रुईकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना आधार दिला आहे. आजची मदत शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली आहे.

नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले

बीडच्या एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी तिरुपतीला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आणि याचीच दखल आता शिवसेने घेतली आहे.

मरेपर्यंत शिवसेनेची सेवा करणाऱ्या दिगंवत शिवसैनिकाच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती मदत

दरम्यानं , शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एकटीच पडली होती. पत्नीने उद्धव ठाकरे यांनी एक अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होत की, "उद्धवसाहेब, माझ्या नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेला दिलं, आता त्यांच्या माघारी आम्हाला मदत करा", पतीच्या निधनानंतर, आमचं कुटुंब मात्र बेघर झालं आहे. असं शिवसैनिकाच्या पत्नीने अर्जात , म्हटलं होत. त्यानंतर त्यांना तातडीने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी तातडीने मोठी मदत केली आहे.

एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती

सुमीत यांच्या जाण्याने कुटुंबीय धाय मोकलून रडत आहेत. घरातले कर्तेधर्ते सुमंत यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सुमंत यांच्या पाश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखच निघून गेल्याने आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता. पण शिवसेना कुटुंबियांच्या मागे ठाम आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती.

 

असा झाला शिवसैनिक सुमंत यांचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंन दीर्घायुष्य लाभावे यामुळे तिरुपतीला साकडे घालण्यासाठी तिरुपतीला पायी जात असताना पदयात्रेदरम्यान ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी