संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली, खैरे स्वत:च शिवसेनेत नाराज संदीपान भुमरेंचा खळबळजनक दावा

minister sandipan bhumre says chandrakant khaire is not happy in shivsena : रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. चंद्रकांत खैरे हे स्वतःच शिवसेनेत नाराज असल्याचं वक्तव्य भुमरे यांनी केलं आहे.

minister sandipan bhumre says chandrakant khaire is not happy in shivsena
संदीपान भुमरे,चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली,एकमेकांवर टीका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांची पुन्हा एकमेकांवर जोरदार टीका
  • खैरेंना मातोश्रीवर कुणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली - भुमरे
  • शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : शिंदे गटातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे ( Minister sandipan bhumre) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे स्वतःच शिवसेनेत नाराज असल्याचं वक्तव्य भुमरे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते हे एकमेकांना सतत डिवचताना पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांना डिवचत म्हटलं होत की, संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत. त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होत. यावर आता संदिपान भुमरे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की,  “होय मी आहेच गावठी मंत्री… मी आहेच मुळात गावठी पण मी कुठेही काहीही बोलत नाही”, असं भुमरे म्हणाले आहेत.

अधिक वाचा ; वजन कमी करताना चुकूनही Breakfast ला खाऊ नका 'या' गोष्टी

खैरेंना मातोश्रीवर कुणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली

पुढे बोलताना मंत्री भुमरे म्हणाले की, या शहराची वाट लागण्याला कारणीभूत चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली. खैरेंना मातोश्रीवर कुणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे या जिल्ह्याला लागलेली कीड आहे. असंही भुमरे म्हणाले.

अधिक वाचा ; पहिल्या सामन्यात ठरला फेल, तरी T-20 मध्ये रोहित आहे अव्वल 

शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! – चंद्रकांत खैरे

दरम्यान, खैरे आणि भुमरे हे अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करत आहेत. शिंदेंसोबत गेलेले १० -१२  आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असा विश्वास खैंरेंनी व्यक्त करत म्हटलं होत की, शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे. यावर उद्धव ठाकरेंचे समर्थक २ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. असं म्हटलं आहे.

अधिक वाचा ; या बायकांपासून दूर राहण्यास सांगताय चाणक्य, जाणून घ्या कारण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी