पुणे हादरले ! मारहाण करत मित्रानेच केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Minor boy sexually assault in pune : डीत मुलाने त्याच्यावर २१ वर्षाच्या सागर सोनवणे या  मुलाने केलेला अनैसर्गिक अत्याचार त्याने आपल्या घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Minor boy sexually assault  in pune
मित्रानेच केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला
  • पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत
  • गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Minor boy sexually assault  in pune पुणे : दांडेकर पूल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच शारीरिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास केला आणि आरोपी तरुणाला अटक केली आहे. आपल्या मुलावर एका मुलानेच अत्याचार केलं असल्याचं समोर आल्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल होताच. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळजाई पठार येथे राहणारा १६  वर्षीय मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी दांडेकर पूल परिसरात गेला होता. यावेळी अल्पवयीन मुलाला त्याचा जुना मित्र सागर सोनवणे भेटला. सागर सोनवणे हा २१ वर्षाचा असून, त्याने पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्यात गुंतवत आणि जवळच असणाऱ्या एका स्वच्छतागृहात नेलं. यानंतर तेथे त्याला मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

पिडीत मुलाने त्याच्यावर २१ वर्षाच्या सागर सोनवणे या  मुलाने केलेला अनैसर्गिक अत्याचार त्याने आपल्या घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तक्रारीनंतर तात्काळ शोधमोहिम हाती घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, पोलीस देखील सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

१३ व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट

फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली. (Waiter commits suicide) रेस्टॉरंट इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो २६ वर्षांचा होता. सदर घटना पुणे शहरात घडली आहे. 

अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे

घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले जात आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी