Minor girl 5 months pregnant तुळजापूर मंदिर परिसरात भीक मागणारी अल्पवयीन मुलगी ५ महिन्याची गरोदर आढळल्याने जिल्ह्यात खळबळ

Minor girl 5 months pregnant in tuljapur : जिल्हा प्रशासनाकडे तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी मुले मुली यांची कोणतीही नोंद नसल्याने असे प्रकार घडत आहेत त्यामुळे यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे

Minor girl 5 months pregnant in tuljapur
अल्पवयीन मुलगी ५ महिन्याची गरोदर आढळल्याने जिल्ह्यात खळबळ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अल्पवयीन मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी - संजयकुमार बोंदर
  • मंदिर परिसरात आठ ते दहा वर्षाची मुले - मुली स्वतःच्या काखेत झोळी बांधून फिरताना आढळतात
  • शाळा बंद केल्यामुळे भिक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

Minor girl 5 months pregnant  उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ ते १४ वर्षाची अल्पवयीन भिक मागणारी मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून , सदर घटनेने मोप्ठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस अधीक्षक निवा जैन यांना कळविले असल्याची माहिती बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी दिली असुन आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.

भीक मागणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलीवर असे अत्याचार होत असल्याच्या घटना

जिल्हा प्रशासनाकडे तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी मुले मुली यांची कोणतीही नोंद नसल्याने असे प्रकार घडत आहेत त्यामुळे यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. दरम्यान, आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर शहरात हा प्रकार घडला असुन या मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली आहे. भीक मागणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलीवर असे अत्याचार होत असुन अनेक प्रकरणे दडपली जात आहेत असा आरोप केला जात आहे.

अल्पवयीन मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी - संजयकुमार बोंदर

तुळजाभवानी मंदिर परिसरातील शिक्षणबाह्य बाल भिक्षेकरीना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व अल्पवयीन मुलांचा भिक मागण्यासाठी वापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी विशेष बाल सहाय्य पोलीस पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांनी जिल्हाधिकारी तथ जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंदिर परिसरात आठ ते दहा वर्षाची मुले - मुली स्वतःच्या काखेत झोळी बांधून फिरताना आढळतात

मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावून बरेच पालक स्वतः नशापाणी करून लहान मुलांवर देखरेख करत बसलेली असतात. मंदिर परिसरात आठ ते दहा वर्षाची मुले - मुली स्वतःच्या काखेत झोळी बांधून एक ते दोन महिन्याचे बाळ  झोपवून भाविकांना भीक मागत असतात. झोळी मधील बालक कधीच रडत नाही, ते बालक दिवसभर झोळीत झोपलेले असते त्या बाळाला काही तरी नशा करून झोपवले असण्याचा संशय येत आहे.

 

शाळा बंद केल्यामुळे भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

तुळजाभवानी मंदिर परिसरात अल्पवयीन मुले व मुली  भीक मागत आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणारी सर्व मुले शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मागील दीड वर्षांपासून शाळा बंद केल्यामुळे भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये वय वर्ष अंदाजे १३ ते १५ वयोगटातील मुलींचे त्याच्याच नातेवाईकांकडून शोषण होत असल्याचे दिसून येत आहे. वयाच्या १४ ते १५ व्या वर्षी आई झालेल्या आहेत मग त्याचा बालविवाह झालेला असेल किंवा त्याच्यावर शारीरिक अत्याचार होत असेल अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी