धक्कादायक! उस्मानाबादमध्ये घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jan 29, 2021 | 18:44 IST

Gang rape of a minor girl: सदर प्रकार अतिशय धक्कादायक असून, जबरदस्ती तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन नेल्याची माहिती समोर आली आहे. नराधम हे पीडित मुलीच्या घराशेजारीच राहत होते.

osmanabad gangrep
घरातून उचलून घेऊन जात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • नराधमांनी जबरदस्ती तिच्या घरात घुसून मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन गेले
  • पोलिसांनी दोघांना अटक केली आहे
  • पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल

उस्मानाबाद : उस्मानाबादेत (osmanabad district) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) करण्यात आला आहे. असून त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान महिला सक्षमीकरणाच्या अनेक बाता मारल्या जातात. मात्र, त्या कृतीत उतरत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक संस्था-संघटनांकडून महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी वेगवगळे उपक्रम राबविले जातात. मात्र, तरीदेखील महिला अत्याचाराच्या घटना सर्रासपणे घडताना दिसतात. सदर पीडित मुलीचे वय १४ वर्ष आहे. सदर धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील (tuljapur taluka) अणदूर (anadur) या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा हादरला आहे.

जबरदस्ती घरात शिरले, मुलीला घरातून उचलून नेलं

दरम्यान सदर प्रकार अतिशय धक्कादायक असून, जबरदस्ती तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन गेले. असल्याची माहिती समोर आली आहे. नराधम हे पीडित मुलीच्या घराशेजारीच राहत होते. दरम्यान त्यानी तिला उचलून घेऊन गेल्यानंतर त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. पीडित मुलीचीवर सध्या रुगणालयातउपचार सुरु आहेत.

याप्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी घटनेची दखल घेत तत्काळ दोन आरोपींना अटक केली आहे. तर या घटनेतील आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. (Gang rape of a minor girl)

नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान सदर बलात्काराप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आल्याची माहिती पोलीस खात्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांनी या सदर घटनेची माहिती दिली आहे. तसेच सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे करीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी