बीड : महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला छेडछाड करत तिला त्रास दिल्याने घटनेचा जाब विचारल्यामुळे पिडीत मुलीच्या आईचा तीक्ष्ण हत्याराने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. सदर घटनेतील आरोपी हे खून करून फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली आहे. सदर घटना ही बीड जिल्ह्यातील वानटाकळी तांडा येथे घडली होती. सदर घटनेने जिल्ह्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्टात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा ; क्रिकेटमध्येही पुरुष गडीला भारी पडल्या बाया, वाचा टॉप विक्रम
मिळालेय माहितीनुसार, परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथे सदर हत्येची घटना घडली आहे. पिडीत मुलीचे आई अनिता राठोड आणि वडील वैजनाथ राठोड हे बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी अनिता आणि वैजनाथ यांच्या ३ मुली या घरीच होत्या. यादरम्यान, तांडा येथेच राहणाऱ्या मुलीना त्रास देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, सुरु असलेल्या त्रासाला मुली कंटाळल्या होत्या. मुलीनी आई आणि वडील हे परत आल्यानंतर बबनने दिलेला त्रास आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर मुलीचे आई आणि वडील यांनी दोन दिवसापूर्वी बबन चव्हाण मुलीना का त्रास दिला असं विचारले. यानंतर बबन चव्हाण आणि मुलीच्या आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले. आणि याचाच राग मनात धरून काल मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बबन चव्हाण त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण भाऊ सचिन चव्हाण यासह इतर तिघांनी राठोड कुटुंबियांच्या घरी जाऊन भांडण देखील केले.
अधिक वाचा ; व्हायग्रा घेणे पडले महागात, सेक्स करताना ४७ वर्षीय व्यक्तीचा
दरम्यान, चव्हाण आणि राठोड कुटुंबाचा सुरुवातीचा वादाचे रुपनात्र मोठ्या भांडणात झाले. वैजनाथ राठोड यांना काही लोकांनी मारहाण होऊ नये म्हणून रूममध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. यावेळी, चव्हाण कुटुंबातील लोकांनी दुसर्या रूममध्ये असलेल्या अनिता राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि अनिता राठोड यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून व डोक्यात लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यानंतर नागरिकांनी गंभीर अवस्थेत अनिता राठोड यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अधिक वाचा : IND vs WI: जे कोणालाच जमले नाही ते हार्दिकने करून दाखवले