Shivsena : पहिल्यांदाचं शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने - सामने, पोलिसांनी केला तगडा बंदोबस्त

औरंगाबाद
Updated Nov 07, 2022 | 09:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aditya Thackeray and Srikant Shinde will face each other for the first time ; औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड दौऱ्यावर दोन्ही दिग्गज नेत्यांचे पुत्र येणार आहेत. सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार असून, दोन्ही नेते भाषणात काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. श्रीकांत शिंदे जाहीर सभेतून तर आदित्य ठाकरे पदाधिकारी संवाद कार्यक्रमातून भाषण करणार आहे.

Aditya Thackeray and Srikant Shinde will face each other for the first time
शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने - सामने  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे समोर – समोर येणार
  • सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार
  • औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात उद्यासाठी तगडा बंदोबस्त लावला

Shivsena : औरंगाबाद काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला होता. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, भाजपसोबत जात शिंदेंनी राज्याचे मुख्यमंत्री पद देखील मिळवले. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट सतत एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळतात. आज पहिल्यादांचं उद्धव (Uddhav Thakrey) ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे समोरासमोर येणार आहेत. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे. दोन्ही नेते औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड दौऱ्यावर येत आहेत. या दोन्ही युवा नेत्यांची एकमेकांविरोधात तोफ धडाडणार आहे. (mla Aditya Thackeray and mp Srikant Shinde rally in aurangabad sillod ahead of election)

अधिक वाचा ; आदिवासी बांधवांची एकी अन् गावातील उभी बाटली केली आडवी

सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड दौऱ्यावर दोन्ही दिग्गज नेत्यांचे पुत्र येणार आहेत. सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार असून, दोन्ही नेते भाषणात काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. खासदार श्रीकांत शिंदे जाहीर सभेतून तर आमदार आदित्य ठाकरे पदाधिकारी संवाद कार्यक्रमातून भाषण करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू असून, आज होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा ; ऐतिहासिक सिनेमांत इतिहासाचा विपर्यास, संभाजीराजे संतापले

सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार शिंदेंची सभा

श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार असून, गेल्या तीन दिवसांपासून याची तयारी करण्यात येत आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या स्टेजसाठी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात परवानगी देण्यात आली आहे.

अधिक वाचा ;  तिरुपती मंदिराची संपत्ती जाहीर, किती टन सोने अन् रोकड? पाहा 

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात उद्यासाठी तगडा बंदोबस्त लावला

दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पुत्रांची सभा एकाच दिवशी असल्याने पोलिसांवर देखील मोठा तणाव आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात उद्यासाठी तगडा बंदोबस्त लावला आहे. यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आज सिल्लोड शहरात छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी