मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आमदार कैलास पाटलांनी उपोषण घेतले मागे, पहा व्हिडीओ

MLA Kailas Patil called off his fast after seven days ; 2020 साली जिल्ह्यात अतिृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विमा भरून देखील विमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास नकार दिला होता. शेवटी हा वाद न्यायालयात गेला असता न्यायालयाने आदेश देवूनही विमा कंपनी पैसे देत नसल्याने कैलास पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

MLA Kailas Patil called off his fast after seven days
सात दिवसानंतर आमदार कैलास पाटलांनी उपोषण घेतले मागे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमदार कैलास पाटील यांचं गेल्या 7 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण आज स्थगित
  • विमा कंपनी पैसे देत नसल्याने कैलास पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते
  • ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून जल्लोष केला

उस्मानाबाद : उस्मानाबाद 2020 वर्षाचा थकीत पीकविमा मिळावा तसेच आणखी काही मागण्या घेऊन मागणीसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण करत होते. काल पर्यंत शांततेत चालणारे आंदोलन हिंसक झाले व आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर आज आमदार कैलास पाटील यांनी उपोषण तूर्त मागे घेतले आहे. कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

अधिक वाचा ; याप्रकारे मेथीचा वापर करून केसांमधल्या कोंड्याला करा बाय-बाय

विमा कंपनी पैसे देत नसल्याने कैलास पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते 

2020 साली जिल्ह्यात अतिृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विमा भरून देखील विमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास नकार दिला होता. शेवटी हा वाद न्यायालयात गेला असता न्यायालयाने आदेश देवूनही विमा कंपनी पैसे देत नसल्याने कैलास पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. गेल्या सात दिवसापासून आमदार कैलास पाटील हे बेमुदत उपोषण करत होते. कैलास पाटील हे शांततेत उपोषण करत असताना त्यांची तब्येत बिघडत असल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. यावेळी शांततेत सुरू असलेलं आंदोलन काल हिंसक झाले आणि याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतली. कैलास पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या दरम्यान विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मध्यस्थी नंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलन स्थगित केले असले तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कैलास पाटील यांनी दिला आहे.

अधिक वाचा : एलआयसी देतेय कमी व्याजदरात 20 लाखांपर्यतचे कर्ज, पाहा फायदे 

ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून जल्लोष केला

आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेताच ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून जल्लोष केला. ऐन दिवाळीत आमदार पाटील हे उपोषणाला बसले होते, त्यामुळे आम्हाला दिवाळीचा सण साजरा करता आला नाही आज कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले त्यांच्या मागण्या मान्य झाल्या त्यामुळे हीच आमची दिवाळी असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पिक विम्याच्या मुद्यावरून जिल्ह्यात अनेक वर्ष पासून जोरात राजकारण रंगते आहे. मात्र विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना विमाची रक्कम अद्यापर्यंत मिळाली नाही आमदारांनी केलेले आंदोलन प्रशासनाने उगरलेल्या कारवाईचा बडग्यानंतर तरी कंपनीने ताळ्यावर येत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देणे गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे.

अधिक वाचा ; दात किडण्याची समस्या आहे? मग हे आहेत सोपे 4 रामबाण उपाय 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी