उस्मानाबाद : उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. जिल्ह्यातील पीक विम्याचा कंपनीने निर्माण केलेला पेच व तद्नंतर रिट पिटिशन दाखल करून शेतकऱ्यांनी दिलेला न्यायालयीन लढा व त्याला मिळालेले यश, या सर्व इत्यंभूत बाबी कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत. त्याचबरोबर लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची व कंपनीस नुकसानभरपाई तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. यावर लागलीच मुख्यमंत्री महोदयांनी कृषी सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पिकविम्या बाबत सकारात्मकता दर्शविली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील असून, त्याला नक्कीच यश मिळेल असं केलास पाटील यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; नातवंडासाठी वृद्ध दाम्पत्याची म्हणून लेकासह सुनेला कायदेशीर
अधिक वाचा : कंगना राणावतने केला खुलासा, सांगितले लग्न न होण्याचे कारण