उस्मानाबाद - मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात येण्याचा अधिकार नाही अस वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. महविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होत, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा शब्द पाळला नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन निलंगेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले असं वक्तव्य पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. संजय बनसोडे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं आहे.
विरोधक त्यांची भूमिका मांडत असतात , मुख्यमंत्री सन्मानाने येतील व मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतील असा असं देखील संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा मुक्ती दिन साजरा करायला औरंगाबाद याठिकाणी येणार असून, त्यांना भाजपा सोबत एमआयएमने देखील विरोध केला आहे. औरंगाबाद शहरात यासंदर्भात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने औरंगाबाद शहरात पोलीस पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मला असं वाटत नाही की, मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात येण्याचा कुठलाही अधिकार शिल्लक राहिलेला नाही. कारण, महाविकासआघाडी सरकार ही मराठवाडा विरीधी सरकार आहे. मराठवाड्यातील ७० टक्के विकासाच्या निधीवर त्यांनी घाला घातला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जेव्हा मराठवाड्याचा दौरा केला होता, त्या वेळेस ते ज्या बांधावरील गेले होते, त्या बांधावरील शब्द मला आणखी आठवत आहेत. ज्या शेतकऱ्यांना त्यांनी शब्द दिला होता की, आम्ही तुम्हाला ५० हजार रुपये देऊ, शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू, कुठे गेले ते शब्द असा सवाल देखील निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
मराठवाड्यात गेल्या १५ दिवसात अतिवृष्टी झाली. काही भागात ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाउस आणि ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल. एवढे नुकसान झाले असताना पंचनामे करण्याची गरज नाही. तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत केलो पाहिजे. मागचे शब्द तुम्हाला पुन्हा आठवून देत आहोत,यापूर्वी मराठवाड्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करा आणि तेव्हाच मराठवाड्यात या अन्यथा तुम्हाला मराठवाड्यात येण्याचा कुठलाही अधिकार नाही. असं निलंगेकर यांनी म्हटलं आहे.