Shinde-Thackeray-BJP : शिंदे गटाचा भाजप आणि ठाकरे गटाला धक्का 

Grampanchayat Election Result : राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि भाजपने युती करून सत्ता स्थापन केली असली तरी औरंगाबाद येतील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनेलने भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या  पॅनलला धक्का देत वर्चस्व कायम राखले आहे.

MLA Sanjay Shirsat continues to dominate Vadgaon Kolhati Gram Panchayat; Won 11 out of 17 seats
शिंदे गटाचा भाजप आणि ठाकरे गटाला धक्का  
थोडं पण कामाचं
  •  वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर आमदार संजय शिरसाट यांचे प्रभुत्व कायम ;  
  •  वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 11 जागेवर विजयी
  • संजय शिरसाट यांच्या हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनेलने भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या  पॅनलला धक्का देत वर्चस्व कायम राखले आहे.

औरंगाबाद :  राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि भाजपने युती करून सत्ता स्थापन केली असली तरी औरंगाबाद येतील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीमध्ये आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ग्रामविकास पॅनेलने भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या  पॅनलला धक्का देत वर्चस्व कायम राखले आहे. 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.  (MLA Sanjay Shirsat continues to dominate Vadgaon Kolhati Gram Panchayat; Won 11 out of 17 seats)

अधिक वाचा : Shiv Sena BJP yuti: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदार आणि राणेंमुळे झाली बिघाडी, वाचा नेमकं काय घडलं?

सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आणि राजकीय समीकरणात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच हाती आला असून वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली असून आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुक रिंगणात उभ्या राहिलेल्या 17 पैकी 11 उमेदवाराचा दणदणीत विजय झाला आहे.

अधिक वाचा : आदित्य यांच्या बदनामी करण्यात राणेंचा मोठा वाटा : केसरकर

 या ऐतिहासिक विजयाने पुन्हा आ.संजय शिरसाट यांचे विकासन्मुख स्वामित्व परिसरात सिद्ध झाले आहे.राजकीय समीकरणाच्या प्रभुत्वासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुक  रिंगणात शिवसेना,भाजपा,आ.संजय शिरसाट गट, मराठवाडा बहुजन विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारासहित एकूणच या निवडणूक रिंगणात 72 उमेदवार उभे होते.

अधिक वाचा : 'जोकर'च्या सिक्वेलमध्ये लेडी गागा साकारणार भूमिका

 72 उमेदवारासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वांचेच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते आज या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांच्या गटाने 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवला आहे , तर शिवसेना पुरस्कृत शिवशाही निष्ठावंत पॅनलने 13 पैकी 4 जागेवर विजय मिळवला आहे  तर भाजपने या ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी अवघ्या 2 जागेवर विजय मिळवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी