हिंगोली : शिंदे गटात शिवसेनेचे अनेक आमदार सामील झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन प्लान आखण्यात येत आहे. शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना टक्कर देण्यासाठी प्रतिस्पर्धी तयार करण्यात येत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे, बांगर यांना मजबूत विरोधक तयार करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. संतोष बांगर यांना प्रतिस्पर्धी म्हणून अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. अजित मगर हे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर विरोधक म्हणून समजले जातात. त्यामुळे, संतोष बांगर यांच्या विरोधात मगर यांनी जर भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवली तर बांगर यांना मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
उध्दव ठाकरे : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून मगर यांनी शिवसेनेत प्रवेश करून बांगर यांना शह द्यावा अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दरम्यान, मगर देखील शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच, मगर यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथे २२ जुलैला महादेवाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत मगर यांनी आपल्याला राज्यातील काही प्रमुख पक्षांकडून पक्षात प्रवेश करावा अशा ऑफर दिली जात असल्याचं म्हटलं आहे. असं मगर यांनी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करतना म्हटलं आहे.
अधिक वाचा ; हे घरगुती उपाय पावसाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर देतील आराम
अजित मगर हे नेमके शिवसेनेत प्रवेश करणार की नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा आग्रह धरला आहे. मात्र, मी लवकरच माझी भूमिका जाहीर करणार असल्याचं अजित मगर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित मगर यांना कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा त्यांना आग्रह धरला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मगर यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी,अशी मागणी करण्याचा आग्रह देखील करण्यात येत आहे. अजित मगर जर शिवसेनेत गेले तर संतोष बांगर यांना मात्र येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण अजित मगर यांची देखील मतदारसंघावर मोठी वचक आहे.
अधिक वाचा : राजद्रोहाची शिक्षा झाली त्यातले बहुतांश लेखन नव्हते टिळकांचे